सुकमा दहशतवादी हल्ला : नक्षलवाद्यांकडून अक्षय कुमारचा निषेध

0

मार्च महिन्यात सुकमा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे २५ जवान शहीद झाले होते. या हल्ल्यानंतर अक्षय कुमार याने शहीद जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ९ लाख रूपये तर सायना नेहवाल हिने प्रत्येक कुटुंबाला ५० हजार याप्रमाणे  सहा लाख रूपयांची आर्थिक मदत देऊन केली होती.

शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देणाऱ्या बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांच्याविषयी नक्षलवाद्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

नक्षलवाद्यांनी त्यांच्या या कृतीचा निषेध व्यक्त करणारी पत्रके वाटली आहेत.

या पत्रकांमध्ये आम्ही नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांच्या कुटुंबियांना देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीचा निषेध करत असल्याचे म्हटले आहे.

देशातील प्रसिद्ध व्यक्ती, कलाकार, खेळाडू आणि सेलिब्रिटींनी क्रांती आणि गरिबांच्या बाजून उभे राहावे, असे आवाहन आम्ही करतो. तसेच त्यांनी पोलिसांच्या अत्याचाराचा आणि मानवी हक्कांच्या उल्लंघनाविरोधात आवाज उठवावा, असे नक्षलवाद्यांनी वाटलेल्या पत्रकांत म्हटले आहे.

LEAVE A REPLY

*