Type to search

आवर्जून वाचाच विशेष लेख

सुंदरा मनामध्ये भरली…

Share

तीची व माझी लहानपणाची घट्ट मैत्री ती आमच्या घराच्या मागच्या गल्लीत राहायची.माझ्या पेक्षा 2 वर्ष लहान होती पण मी शाळेत ढ असल्याने मी तिसरीत असताना नापास झालो व ती मागच्या वर्गातून माझ्या सोबत तिसरीत आली दिसायला ती इतकी सुंदर होती की जणू देवाने तिला अप्सराचेच रूप देऊन खाली पाठवली तिचे नाव रूपाली (या कथेतील रूपाली व हरी यांचे पात्र काल्पनिक आहेत) नावा प्रमाणेच रूपवती लांब लचक केस,बारीक डोळे, छानसा तिचे शरीर बांधा व तिचे स्मित हास्य म्हणजे दुसर्‍याच्या चेहर्‍यावर कितीही दुःख असले तरी तिच्या त्या एका घायाळ हास्याने व नजरेने हरीला वेळ लागायचे.

केव्हा केव्ह हरीला या गोष्टी चा खूप आनंद व्हायचा व मनाच्या मानत हरी म्हणायचा बर झालं मी सलग दोन वर्षे नापास झालो रुपाली ने जेव्हा तिसरीच्या वर्गात प्रवेश केला त्त्याच दिवसा पासून हरी व रुपाली ची संपर्क अभियान जास्त सुरू झाले तसे ते दोघे एकमेकांना ओळखायचे पण शाळेचे अंतर असल्याने त्याची ओळख फक्त मागची गल्ली ते पुढची गल्ली फक्त एवढीच पण आता हरी व रुपाली ची शाळा सारखीच असल्याने त्याची मैत्री रुपी शाळा आता हळूहळू पाचवी पासून पुढे जाऊ लागली आता हरी साठी रुपाली ही रुपाली नसून त्याच्या साठी ती रूपवती झाली होती व हरी तिला आता प्रेमाने रूपा म्हणायचा तर हरी ची व रूपाचे प्रेमाची शाळा इतकी भरली की त्याची मागची गल्ली केव्हा पुढे आली ते त्यांना कळलेच नाही. रूपा ही आईवडीलांची एकुलती एक तर हरी पण ,पटलाचा लेक व एकुलता एक असा होता.

रूपा शाळेत खूपच हुशार होता पण हरी पहिल्या पासून ढ च होता तरी त्याच्या या प्रेमाच्या शाळेत कधीच त्यानि असा भेदभाव केला नाही शाळेत हरीला मुलं तुझी सुंदरा आली असे खुपच चिडवत तर मुली ही रूपा ला चिडवत त्याचे हळूहळू रूप व हरी च्या घरच्यांना हे प्रेम प्रकरण त्याच्या कानी येऊ लागले रूपाला तिच्या आईवडीलानी खूप समजावले मारले सुध्दा तर इकडे हरी चे घरचे ही या गोष्टी ला हरी ला ना करत होते तर का दोघी घरचे नाही म्हणत होते तर त्याला ही असे क्षुल्लक कारण होते ते म्हणजे मुलगा आपल्या समाजाचा नाही, मुलगी आपल्या समाजाची नाही, हरी व रूपा च्या या लहान पण च्या प्रेमाला व त्यांनी आपल्या भावी आयुष्य रंगवलेल्या स्वप्नाचा, या जातीच्या, समाजाच्या व्यवस्थेने त्याचे सर्व प्रेम रुपी हरी व रूपा ची शाळा वाहून तर जाणार नाही ना ?असा प्रश्न हरी व रूपा ला सत्यत्याने सतावत होता, ते दोघे पूर्ण वयात असल्याने त्यांनी बर्‍याच द्या पळून जाण्याचा ही विचार केला पण, त्यांना कुणाची साथ नसल्याने ते ही व्यर्थ गेले, हरी व रूपा चे हे प्रेम फक्त आणि फक्त एक समाजाचे नसल्याने त्याच्या प्रेमावर हे जातीचे विरजण पडले .

गल्लीतील बर्‍याच श्या सुशिक्षित माणसांनी ही दोघांच्या घरी जाऊन व यांचे लग्न लावून द्या असे करण्याचा प्रयत्न केला पण त्याला काही यश आले नाही सर्व प्रयत्न संपले सर्व पर्याय संपले मग काय फक्त प्रेमा पोटी हरी व रूपा ने शेवटी वेगवेगळे होण्याचा निर्णय घेतला व त्याचे हे लहानपणी चे शाळेचे सुंदरा चे प्रेम फक्त नावापुरती प्रेम राहून त्याचा तो इतिहास होऊन गेला, काय खरच गुन्हा होता का या हरी व रूपा चा? की त्यांनी प्रेम केलं? का ही जात व्यवस्था प्रेमाला आड येत आहेत हरी व रूपा समजदार होते त्याच्या जागी असे बरेच प्रेमवीर शेवटचा निर्णय घेतात (म्हणजे आत्महत्या) हिरकणी सारखी, अप्सरा सारखी, दिसणारी रूपा हरीच्या मनात सतत मरे पर्यंत राहिलीच व पुढे ही असे बरेच हरी व रूपा घडतील कारण प्रेम हे प्रेम असते त्यात जात धर्म पंथ हुशार गरीब लहान मोठे असे काहीच नसते .हरीच्या मनातील सुंदरा हरी ला शेवटी मिळाली नाही पण रूपा ही हरीच्या प्रेमात ची सुंदरा हरीच्या मनात , रूपवती सुंदरा मनामध्ये कायमस्वरूपी भरली अशी सुंदरा मनामध्ये हरीच्या.
– हर्षल अशोक पाटील, मो. 8975183672

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!