पोलीस प्रशासनाचे काम गतिमान व पेपरलेस करण्यासाठी सीसीटीएनएस यंत्रणा कार्यान्वित

गुन्ह्यांचे अहवाल दाखल करण्याची ३१ मार्च अंतिम मुदत

0

नाशिक | खंडू जगताप देशभरातील पोलीस प्रशासनाचे काम गतिमान व पेपरलेस करण्यासाठी सीसीटीएनएस (क्राइम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टम) यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्याच्या गृह विभागाने कृती दल स्थापन केले आहे.

सर्व गुन्ह्यांचे अहवाल ३१ मार्चपर्यंत सीसीटीएनएस मध्येच दाखल करण्याAdd Newचे आदेश पोलीस ठाण्यांना दिले गेले आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाची धांदल उडाली आहे. नाशिक शहर व नाशिक जिल्ह्यातही हे काम प्रगतीवर असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

गुन्हा व गुन्हेगारीचा माग काढण्यासाठी ङ्गसीसीटीएनएसफ (क्राइम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टम) प्रकल्पाच्या माध्यमातून ङ्गमिशन मोड प्रोजेक्टफ देशभरात लागू करण्यात आला आहे. राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात गेल्या वर्षभरापासून याचा वापर होत असला तरी त्याच्या प्रभावी वापरासाठी आता गृहमंत्रालयाने राज्यातील पोलीस प्रशासनाला धारेवर धरले आहे.

गुन्हा घडल्यानंतर आरोपीचा शोध घेऊन प्रबळ पुराव्यांसह न्यायालयात दोषारोपण सादर करताना पोलीस यंत्रणेचा वेळ मोठ्या प्रमाणात खर्च होतो. काही गुन्ह्यांत वेळीच गुन्हा सिद्ध करणार्‍या पुराव्यांचा शोध अपूर्ण राहतो. त्याचा फायदा न्यायालयात आरोपींना मिळतो. याशिवाय मोबाइल, इंटरनेटच्या गैरवापरातून सायबर गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशा गुन्ह्यांची नोंद करून त्याचा माग काढताना पोलिसांच्या नाकीनऊ येते.

साहजिकच, सायबर गुन्हे करणार्‍यांच्या संख्येत वाढ होत आहे. अशा सर्व तर्‍हेच्या गुन्ह्यांचा तातडीने तपास करण्यासाठी सीसीटीएनएस प्रकल्प देशभरात लागू करण्यात आला.

३१ मार्चपूर्वी काम पूर्ण होणार
ङ्गसीसीटीएनएसफ प्रकल्पांतर्गत नाशिक शहर पोलीस विभागाने विशेष प्रगती केली आहे. सीसीटीएनएस सुरू झाल्यापासून सर्व गुन्ह्यांच्या नोंदी त्यावर करण्यात येत आहेत. गुन्हे प्रकटीकरण, पुरावा जमा करणे व राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांतील गुन्हेगारांची माहिती प्रत्येक पोलीस ठाण्यास उपलब्ध करून न्यायालयात अपराध सिद्धतेचे प्रमाण वाढवण्यासाठी आयुक्तांनी विशेष प्रयत्न केले आहेत. केवळ गुन्हे शोध व न्यायालयाशी संबंधित अहवाल त्यावर दाखल करावयाचे असून ३१ मार्चपूर्वी हे काम पूर्ण होईल.
सचिन गोरे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे विभाग

LEAVE A REPLY

*