सीबीआय चौकशीवरुन सीईओंचा तिळपापड

0

जळगाव | प्रतिनिधी :  जिल्हा बँकेच्या ७३ लाखांच्या नोट बदलीप्रकरणाची जिल्हा परिषदेच्या चार अधिकार्‍यांची चौकशी झाली असल्याने जिल्हा परिषद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या चौकशीमुळे जिल्हा परिषदेची बदनामी होत असल्याने सीबीआय चौकशीवरून आज सीईओ अस्तिककुमार पाण्डेय यांचा चांगलाच तिळपापड झाला होता.

नोट बदली प्रकरणात जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नंदकुमार वाणी, कक्षाधिकारी सुनिल सुर्यवंशी, बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता नंदू पवार, स्थापत्य यांत्रिकी विभागातील भुषण तायडे या चौघांची सीबीआय चौकशी करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जिल्हा परिषद बदनाम झाली असल्याने आज जिल्हा परिषदेचे सीईओ चांगलेच संतप्त झाले होते.

दरम्यान सीईओंकडून चौकशी झालेल्या अधिकार्‍यांची पाठराखण तर केली जात नाही ना? असा प्रश्‍न निर्माण होत आहे. जिल्हा परिषदेच्या सीईओंच्या या भुमिकेबाबत आज चांगलीच चर्चा रंगली होती.

बडया माश्याचे नाव उघड करा

जिल्हा परिषदेचा सीबीआय चौकशीशी संबंध नाही. त्यामुळे सीबीआय प्रकरणात बडया अधिकार्‍याचा समावेश असल्याने या बडया माश्याचे नाव उघड करावे अशी अपेक्षाही सीईओंनी व्यक्त केली.

…तर तिघांची बदली का?

नोट बदली प्रकरणात सीबीआयने सुनिल सुर्यवंशी, नंदू पवार व भुषण तायडे यांची चौकशी केल्यानंतर काही दिवसात तिघांची पंचायत समित्यांमध्ये बदली करण्यात आली आहे. त्यामुळे तिघांची का बदली करण्यात आली असा सवाल उपस्थित होत आहे.

LEAVE A REPLY

*