Type to search

जळगाव

सीटूतर्फे न्याय्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे

Share

जळगाव | जिल्हा बांधकाम संघटना संलग्नीत सीटूतर्फे बांधकाम कामगार,घरेलु कामगार कल्याणकारी मंडळाच योजनांची अंमलबजावणी सह अन्य न्याय्य मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात येवून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

इमारत व इतर नोंदित बांधकाम कामगारांना कामगार कल्याणकारी योजनांचा तीन वर्षांपासून प्रलंबीत असलेला लाभ आचारसंहितेच्या कारणास्तव प्रलंबीत आहे, लाभांची प्रकरणे कामगारांच्या खात्यावर वर्ग करा, औजार खरेदी अनुदान,शैक्षणिक शिष्यवृत्ती,विवाह अनुदान,सेंफ्टीकिट्सचे वाटप,बांधकाम साईटवर नोंदणीसाठी असलेले अर्जांची नोदणी, प्रशिक्षण पुर्ण केलेले कामगारांना स्टायपेंड आदी लाभ विधानसभा आचारसंहिता लागू होण्यापूर्वी खात्यावर वर्ग करण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी कॉ.विजय पवार,भारत मिस्तरी,अजित खान,विनोद आढळके,दिलिप सांगळे,प्रविण भुसनर आदी उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!