सीईटीच्या परीक्षेला 1346 परिक्षार्थीची दांडी

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – अभियांत्रिकीसह औषधनिर्माणशास्त्र या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी राज्य सरकारतर्ङ्गे गुरुवारी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटीच्या गणित, भौतिकशास्त्र-रसायनशास्त्र व जिवशास्त्र या तीन पेपरला एकूण 1 हजार 346 परीक्षार्थी गैरहजर होते. दरम्यान परीक्षा संपल्यावर नगरमधील सर्वच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.सुमारे दिड-दोन तास परिक्षार्थीना सीईटीनंतर वाहतूक कोंडीच्या परीक्षेला सामोरे जावे लागले.
सकाळच्या सत्रात 10 ते 11.30 यावेळेत घेण्यात आलेल्या गणित विषयाच्या पेपरला एकूण 16 हजार 448 पैकी 16 हजार 112 जणांनी परीक्षा दिली.तर, 336 गैरहजर होते. दुपारी 12.30 ते 2 या याळेत भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र विषयासाठी एकूण 22 हजार 6 विद्यार्थ्याची नोंद होती.पैकी 21 हजार 497 जणांनी परीक्षा दिली. तर, 509 गैरहजर होते.जिवशास्त्र विषयासाठी 18 हजार 839 नोंद होती. त्यापैकी 18 हजार 338 जणांनी पेपर दिला.तर, 501 गैरहजर होते.एकूण विद्यार्थ्यापैकी 1346 विविध तीन पेपरला गैरहजर राहिले.
नगरशहरात एकूण 68 केंद्रावर परिक्षा पार पडली. यासाठी सुमारे 22 हजार विद्यार्थ्यानी नोंद केली होती. त्यामुळे परिक्षार्थीसमवेत त्यांचे पालक येणार हे निश्‍चित.याची सर्व माहिती असतानोही पोलिस प्रशासनाने नियोजन न केल्याने परिक्षार्थीसमवेत त्यांच्या नातेवाईकांना वाहतूक कोंडीच्या त्रासाला सामोरे जावे लागले. परीक्षार्थीमध्ये मुलापेक्षा मुलींची संख्या लक्षणीय असल्याचे दिसून आली.तीन सत्रात परीक्षा असल्याने विद्यार्थ्यासोबत आलेले पालक सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यत केंद्र परिसरात तळ ठोकून होते.
संपूर्ण राज्यात 1 हजार 110 उपकेंद्रावर तब्बल 3 लाख 89 हजार 520 विद्यार्थ्यानी नोंद केली होती.सकाळी 11 वाजता पहिल्या पेपरला सुरवात झाली.त्यासाठी विद्यार्थ्याना साडेनऊ वाजता परिक्षा केंद्रावर दाखल व्हावे लागले. उशिरा आलेल्या विद्यार्थ्याना प्रवेश देण्यात आला नाही.दरम्यान नीट प्रमाणे सीईटीला जाचक अटी नसल्याने विद्यार्थ्याची बंधनातून सुटका झाली.
दरम्यान 68 केंद्रावरील पेपर जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारील सैनिक लॉन येथे एकत्रित करुन त्याचा हिशोब करण्यात आला. पर्यवेक्षकांकडून हजर-गैरहजर विद्यार्थ्याची माहिती संकलित करण्यात आली.सर्व कार्यवाही झाल्यावर रात्री पावनेआठ च्या दरम्यान जिल्हा संपर्क अधिकारी व पोलिस कर्मचारी सोबतघेवून पेपरचे वाहन पुण्याकडे रवाना झाले. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात नगर, पुणेसह अन्य दोन जिल्ह्याचे पेपर जमा होणार आहे.

मार्कंडेयतील परीक्षार्थी अंधारात
शहारातील मार्कंडेय विद्यालयातील परीक्षा केंद्रावर अपूर्‍या प्रकाशाअभावी विद्यार्थ्याना अंधारात परीक्षा देण्याची वेळ आली. शाळेच्या तिनही बाजूला उंच ईमारती आहेत. त्यामुळे वर्गात पुरेसा सुर्य प्रकाश येण्यास संधी नाही.सदर बाब सीईटी परीक्षा दरम्यान उघड झाली असली तरी, वर्गात दैनंदिन अध्यापन कसे करत असणार असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

परीक्षेसाठी 35 लाख रुपये खर्च
नगरमधील 68 केंद्रावर परीक्षा घेण्यासाठी राज्य शासनाला तब्बल 35 लाख रुपये खर्च आला. यामध्ये नियुक्त करण्यात आलेले सुमारे 2 हजार अधिकारी-कर्मचारी, पोलिस, पेपर वाहतुक करणारे वाहनचालक याशिवाय पाणी, वीज व स्वच्छतेसाठी 68 केंद्राला प्रत्येकी विद्यार्थ्यामागे 40 रुपये खर्च देण्यात आला. अशी माहिती केंद्रप्रमुख तथा उपजिल्हाधिकारी पुनवर्सन विभाग यांनी दिली.

अमृतवाहिनीतर्फे बससेवा
अमृतवाहिनी इंजिनीअरिंग कॉलेजतर्ङ्गे संगमनेर ते सीईटी परिक्षा केंद्र प्रवास करण्यासाठी मोङ्गत 15 बस उपलब्ध करुन देण्यात आल्या.तर, संग्राम नागरी पंतसंस्थेतर्ङ्गे परिक्षार्थीना खाऊचे वाटप करण्यात आले.

LEAVE A REPLY

*