Type to search

आवर्जून वाचाच जळगाव विशेष लेख

सिनेमा… एक माध्यम

Share

आशिया खंडात भारत एकमेव असा देश आहे जेथें चित्रपट सृष्टीला ‘इंडस्ट्री’ चा दर्जा प्राप्त झाला आहे. शंभरी पार केलेल्या या इंडस्ट्रीत अनेकांचे संसार निगडित आहेत.एकमेव हिंदी सिनेमा म्हणजे मेहबूब खान व्ही शांताराम, के आसिफ, आनंद बंधू, गुरुदत्त अशी तगडी स्टार कास्ट असलेल्या या इंडस्ट्रीत आजवर अनेकांनी आपापल्या कंपनीच्या माध्यमातून अनेकदा सिने रसिकांचे मनोरंजन केले आहे. हिंदी सिनेमा हा जगात सर्वत्र पाहिला जातो. ज्या मुळे देशाला परकीय चलन मिळवून देणारी ही इंडस्ट्री सर्वत्र नावाजली जाते. चेपशू रपव ऋराश आहे म्हणूनच यांस इंडस्ट्री संबोधले जात असावे.

हिंदी सिनेमा पारंपारिक केव्हांच नव्हता, तो सतत बदलत्या कालानुरूप कात टाकत राहिला. आजच्या हिंदी सिनेमातील जरी संगीत बदलले असले तरीही संगीत नसलेला सिनेमा खिडकीवर सपशेल आपटला गेला आहे, हे एकमेवाद्वितीय सत्य होय. यास कानून आणि इत्तेफाक हे सिनेमे अपवाद ठरू शकतात. राज कपूर, देव आनंद, दिलिप कुमार या त्रयीने अनेक वर्षे हिंदी सिनेमा गाजवला. आवारा, गाईड आणि गंगा जमुना ही त्यांची अत्युच्च कमाई करणारी कलाकृती होय. आवारा हूं, या गर्दीश में हूं आसमान का तारा हूं… हे गाणे रशियात आजही आवडीने गायले जाते. आनंद बंधूंचा गाईड ही नवकेतन ने निर्माण केलेली आजवरची अप्रतिम कलाकृती म्हणून जगभर गोरवण्यात आले.

यातील संगीत, क्लासिकल डान्स, अलटिमेट साँगज, मॅच्युर ऍक्टिंग, क्लास फ़ोटोग्राफी, ग्रेट डिरेक्शन! अलिकडे यू ट्यूबवर रशियन प्रमुख पुतीन एका लहान मुलांच्या समवेत ‘आवारा हूं’ गाणे जशेच्या तसे गातांना दिसतात, राज कपूर आणि ‘आवारा’ च्या संपुर्ण टीमला सलाम, ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाइट च्या काळातला तो म्युझिकल हिट सिनेमा आजही डिजिटल जमान्यात लाखों ‘लाईक्स’ घेऊन जातो. भारतच नव्हे तर जगभर अशा हिंदी गाण्यांची जादू आजही दिसून येते. चित्रगुप्त आणि लता मंगेशकर मुळे जगभर गाजलेले गाणे ‘रंग दिलकी धडकन भी’ हे गाणे पाकिस्तान मधील एका शहरातील मेहेंदी मेहफिल मध्ये आवडीने गायले जाते!! विशेष म्हणजे ‘याद मेरी उनको भी आती ही तो जहोगी’ या कडव्यावर डुलत राहणार्‍या तेथे उपस्थित असलेल्या ज्येष्ठ स्त्रिया, फाळणी नंतर कराचीत जाऊन वसलेल्या या आया बहिणींना मूळ भारत कायम याद येतो… तो हिंदी संगीतामुळे!! ही जादू आहे हिंदी सिनेमाची!!

दिलिप कुमार हे मेलोड्रामा ऍक्टिंग साठी आजही अजरामर समजले जाणारे नावं. ‘ट्रेजडी किंग’ म्हणून ओळखले जाणारे दिलीप साहेबांनी अनेक नामवंत सिनेमे दिले, पण ‘गंगा जमुना’ सारखा चित्रपट पून्हा होणे नाही. उतार वयातील ‘राम और श्याम’ देखिल सिनेरसिकाना आवडला म्हणून तो हीलाजवाब. हिंदी सिनेमाची एकूण ओळख जरी या त्रयीं मुळे असली तरी या त्रिकोणाला एक आणखी कोण आहे त्याचे नाव ‘गुरुदत्त’ असे होय. हिंदी सिनेमाला ‘आरसा’ दाखवण्याचे धारिष्ट्य गुरुदत्त च्या एकूण सर्वच सिनेमांनी केलंय. ‘प्यासा’ ज्याने पाहिला नसेल त्याने जरूर पहावा. प्यासा ही गुरुदत्तची अत्युच्च कलाकृती होय. एक ट्रेजीडी शायरची अप्रतिम रचना म्हणजे प्यासा. एक नोव्हेल वाचल्याचे समाधान प्राप्त होते. त्या नंतरचा सिनेमा म्हणजे कॉमेडीची बरसात!!

मिस्टर एंड मिसेस 55 या हलक्याफुलक्या कॉमेडी सिनेमातील एका प्रसंगात ललिता पवार नायकास विचारते तुम करते क्या हो…? त्यावर वेडेवाकडे तोंड करून गुरू म्हणतो दुनियां में कितनी गरिबी है… लोगों के पास घर नही, फुटपाथ पर सोते हैं… ललिता पवार त्वरित विचारते तुम कम्युनिस्ट हो क्या? त्यांवर गुरू ताडकन उत्तर देतो ‘जी नही मैं कार्टुनिस्ट हूं’ असा लाजवाब, गुरुदत्त पुन्हा होणे नाही. त्याचे सर्वच सिनेमे ग्रेट होते. अर्थात त्यांत फिलॉसाफिकल टच जास्त असायचा म्हणून कदाचित सारेच सिनेमे खिडकी गणितात योग्य नाहीं ठरले असतील.

पण हिंदी सिनेमाचा खरा मेकर हा गुरुदत्त होऊन गेला, असं जाणकार सांगतात. हा लेख लिहिण्याचे एकमेव कारण म्हणजे शंभरी पार केलेला हिंदी सिनेमा ुळींर्हेीीं र्ाीीळल ळािेीीळलश्रश आहे. नोशाद अली, सचिन देव बर्मन, जयदेव, शंकर जयकिशन, सलील चोधरी, कल्याणजी आनंदजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल, रोशन अशा नामवंत संगीत तपसविनी हिंदी सिनेमाची उंची सर्वत्रच देशात विदेशात वाढवली त्यांच्या कारकिरदिस सलाम. नुकतेच वर उल्लेख केलेले चित्रपट पुन्हा मी नव्याने मी पहिले आणि सुचलं म्हणून मी लिहल इतकंच.मात्र अलीकडच्या सिनेमा विषयींच्या प्रतिक्रिया देण्याचे मी स्वतः टाळतेय. यावरून जाणकार वाचकांना कळलेच असेल.
जळगाव
9420350171
वैशाली पाटील

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!