Type to search

नंदुरबार

सिदाजी आप्पा देवर्षी यांना अभिवादन

Share

नंदुरबार । येथील वीरशैव लिंगायत गवळी समाज व गवळी समाज महासंघ आणि शहीद शिरिषकुमार मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बालवीर चौकात गवळी समाजाचे आराध्य दैवत परमपूज्य सिदाजी आप्पा देवर्षी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमा पूजनाने अभिवादन करण्यात आले.

कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यातील चीट गुप्पा येथे परमपूज्य सिदाजी आप्पा देवर्षी यांचे मंदिर आहे. 20 मे 1967 रोजी सिदाजी आप्पा यांनी कर्नाटकात समाधी घेतली होती. 52 व्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक विठ्ठल हिरणवाळे यांनी सिदाजीअप्पा देवर्षी यांच्या जीवन चरित्राविषयी माहिती दिली. कार्यक्रमास तुकाराम पहिलवान गवळी, पांडुरंग यादबोले, आनंदा घुगरे,संभाजी हिरणवाळे, पीरण लंगडे, महादू हिरणवाळे, लक्ष्मण बोरसे, गोपाळ हिरणवाळे, रामदास जाधव, सुभाष चौधरी, संजय चौधरी, साहूल कुशवाह आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते . आरती व प्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!