सिटी सेंटर मॉलजवळ आग; अग्निशमन दल घटनास्थळी

0

नवीन नाशिक (प्रतिनिधी) दि. ३ : उंटवाडी रस्त्यावरील सिटी सेंटर शेजारी असलेल्या सिग्नलजवळ दुपारी दीडच्या सुमारास आग लागली.

सिग्नलजवळ असलेल्या सुक्या पालापाचोळ्याने पेट घेतल्याने आग वाढली.

आगीत सिग्नल जळाला असून येथील आंब्याची तीन झाडेही फळांसह जळाली.

मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणल्याचे समजते.

आगीचे कारण तूर्तास समजू शकले नाही.

LEAVE A REPLY

*