Type to search

क्रीडा

सिएट क्रमवारीत मराठमोळ्या स्मृती मंधानालाही पुरस्कार; कोहली,बुमराह सर्वोत्कृष्ठ

Share
मुंबई । टीम इंडियाचा यशस्वी कर्णधार विराट कोहली याला सिएट क्रिकेट रेटिंग पुरस्कारांमध्ये सर्वोकृष्ट फलंदाज पुरस्काराने गौरविण्यात आले, तर आयपीएलच्या यंदाच्या हंगामात अंतिम सामन्याचा सामनावीर ठरलेला जसप्रीत बुमराह याला सर्वोत्कृष्ट गोलंदाज पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यात 2018-19 या कालावधीत सर्वोत्तम कामगिरी करणार्‍या खेळाडूंना पुरस्कार देण्यात आले. माजी क्रिकेटपटू मोहिंदर अमरनाथ यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

‘मला हा पुरस्कार मिळणे हे माझे भाग्यच आहे.’ अशी भावना अमरनाथ यांनी व्यक्त केली. 1983 च्या विश्वविजेत्या संघात त्यांचा समावेश होता. त्या स्पर्धेत भारताच्या विजयामध्ये अमरनाथ यांनी मोलाचा वाटा उचलला होता होता. त्यांना हा पुरस्कार माजी कर्णधार आणि अमरनाथ यांचे तत्कालीन सहकारी सुनील गावस्कर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याशिवाय, यंदाच्या विश्वचषकासाठी जाणार्‍या टीम इंडियाबाबतही त्यांनी मत व्यक्त केले.

ऑॅस्ट्रेलियाचा कर्णधार अ‍ॅरोन फिंच याला सर्वश्रेष्ठ टी-20 खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे. टी-20 मधील सर्वोत्कृष्ठ गोलंदाज म्हणून अफगाणिस्तानचा राशिद खान तर पुजारा यास वर्षातील सर्वश्रेष्ठ कसोटी खेळाडू म्हणून निवडण्यात आले होते.

सीसीआरने महिला क्रिकेटपटूंमध्ये भारतच्या स्मृति मंधानाची वर्षातील सर्वश्रेष्ठ महिला खेळाडू म्हणून निवड केली आहे. भारताच्या पहिल्या विश्वचषक विजेत्या संघातील सदस्य मोहिंदर अमरनाथ लाइफटाईम अचीव्हमेंट अवॉर्ड देण्यात आला. तर यशस्वी जयस्वाल याला सर्वश्रेष्ठ ज्युनियर क्रिकेटर म्हणून निवडण्यात आले आहे.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात अफाट क्षमता आणि अनुभव आहे. मात्र योग्य वेळी कामगिरीत चमक दाखवण्याची गरज आहे. भारताकडे अनुभवी खेळाडू आहेत, मात्र योग्य क्षणी त्यांना लय सापडणे गरजेचे आहे. हार्दिक पांड्याकडे क्षमता आहे, मात्र त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ती सिद्ध करून दाखवण्याची आवश्यकता आहे. विश्वचषकाशी खझङ ची तुलना करणे अयोग्य आहे. झटपट क्रिकेटच्या प्रकारात मोडणार्‍या ङ्गआयपीएलफचे स्वरूप वेगळे आहे. इंग्लंडमधील वातावरणाशी जुळवून घेत त्यानुसार कामगिरी करणे आवश्यक आहे.

जसप्रीत बुमराहकडे विविधता असून भारतासाठी तो महत्त्वाचा गोलंदाज ठरू शकतो, असे अमरनाथ म्हणाले. ऑस्ट्रेलियामधील कसोटी दौरा गाजवणारा आणि कसोटी मालिकेत मालिकावीराचा किताब पटकावणार्‍या चेतेश्वर पुजारा याला सर्वोकृष्ट कसोटीपटू तर सलामीवीर रोहित शर्मा याला सर्वोत्कृष्ट एकदिवसीय क्रिकेटपटू पुरस्कार देण्यात आले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!