सिंधूचा स्पोर्ट ब्रँड कंपनीसोबत करार

0
हैदराबद । भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूसोबत चीनच्या प्रसिद्ध ली निंग या स्पोर्ट ब—ँड कंपनीने 50 कोटी रुपयांचा करार केला आहे. ली निंग कंपनीची भागीदार कंपनी सनलाइट स्पोटर्सचे संचालक महेंद्र कपूर यांनी ही घोषणा केली. या कराराबाबत सिंधूनेही समाधान व्यक्त केले आहे. ली निंग कंपनी सिंधूला प्रशिक्षणासाठीही सहकार्य करणार आहे. सिंधू आणि श्रीकांतने पुढील ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक पटकवावे असे कंपनीचे स्वप्न आहे.

तर ली निंग कंपनी खेळाडूंची अतिशय चांगली काळजी घेते. सिंधूने हा खूपच चांगला करार केला आहे. आपली कामगिरी सुधारण्यासाठी सिंधूला या कराराचा फायदा होईल असे मला वाटते, अशी प्रतिक्रिया सिंधूचे वडील पी. व्ही. रामन यांनी व्यक्त केली आहे.

कंपनीचा हा करार चार वर्षांसाठी आहे. करारानुसार सिंधूला 40 कोटी रुपये मिळणार आहेत. तर, उर्वरित 10 कोटी रुपये क्रीडा साहित्यावर खर्च केले जाणार आहेत.ऑलिम्पिकमध्ये, तसेच वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेत रौप्य पदक पटकावणारी सिंधू ही पहिली भारतीय खेळाडू आहे. ऑलिम्पिकनंतर सिंधूने क्रीडा व्यवस्थापन क्षेत्रात काम करणार्‍या बेसलाइन व्हेंचर कंपनीशी 100 कोटींचा करार केला होता.भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांत याच्यासोबत गेल्या महिन्यात लि निंग कंपनीने 35 कोटी रुपयांचा करार केला होता.

त्यानंतर आता कंपनीने सिंधूशी 50 कोटींच्या रकमेचा करार केला आहे. भारतीय खेळाडूंना तुलनेने कमीच पैसे मिळतात. आम्हाला सिंधू, श्रीकांत आणि इतर भारतीय खेळाडूंचा दीर्घकालीन सहकार्य अपेक्षित आहे. इतकेच नाही, तर त्यांच्या निवृत्तीनंतरही आम्ही त्यांना सहकार्य करणार आहोत. गेल्या वेळी हे खेळाडू योनेक्स कंपनीसोबत गेले होते.

LEAVE A REPLY

*