साहेबराव पाटील भाजपाच्या वाटेवर ?

0
अमळनेर, । दि. 14 । प्रतिनिधी- तालुक्यात येत्या काही दिवसात मोठा राजकीय भूंकप होण्याची चर्चा सध्या सुरू आहे. राष्ट्रवादीचे नेते, माजी आ. साहेबराव पाटील भाजपाच्या वाटेवर असल्याचे संकेत मिळत आहेत.
याबाबत त्यांना थेट प्रश्न विचारला असता त्यांनी राजकारणात काहीही होवू शकते असे सांगून या चर्चेला आणखीनच हवा दिली आहे.
ही चर्चा खरी ठरली तरी शरद पवार व अजित पवार यांच्यावरील माझी निष्ठा व प्रेम कायम राहील असे साहेबराव पाटील यांनी ‘देशदूत’शी बोलतांना स्पष्ट केले.

प्रस्तुत प्रतिनिधीने साहेबराव पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला.

मी अपक्ष आमदार म्हणून निवडून आलो होतो. विकासासाठी राष्ट्रवादीचा सहयोगी बनलो. पाच वर्षात तालुक्यात विकासाची गंगा आणली.

आता माझी पत्नी सौ. पुष्पलता पाटील यांचेसह 22 नगरसेवक शहर विकास आघाडीच्या माध्यमातून निवडून आले आहेत.

त्यांना कुठल्याही पक्षाचे लेबल नाही. त्यामुळे पक्षप्रवेशा बाबत ते काहीही निर्णय घेवू शकतील तेच काय उद्योगपती विनोद पाटील, सेनेचे अनिल अंबर पाटील असो किंवा माझेसोबत असलेले प्रेमी, सूरेशदादांसारखे पहिल्या नेत्यांवर निष्ठा व प्रेम कायम ठेवून निर्णय घेवू शकतात.

चर्चा व नेत्यांचे आमचेकडे येणे, आम्ही त्यांना भेटायला जाणे यातूनच विकासाची झलक आम्हाला दिसून आली. बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आलेले 11 कोटी पुन्हा पालिकेकडे वर्ग झाले आहे हे याचेच द्योतक आहे.

एका मोठ्या नेत्याने आम्हाला शब्द दिला आहे. त्यामूळे तुमच्या राजकिय भूकंपाच्या चर्चेला केंव्हाही पूर्णविराम मिळू शकेल असे संकेत माजी आमदार साहेबराव पाटील यांनी ‘देशदूत’शी बोलतांना दिले.

तालूक्याचे आमदार शिरिष चौधरी यांना पालिकेत सत्ता स्थापन करण्यात अपयश आले. त्यानंतर त्यांनी सर्व प्रथम भूयारी गटारीचा 68 कोटीचा निधी पालिकेकडून जीवन प्राधिकरणकडे प्रशासनाला वर्ग करण्यास भाग पाडले.

दूसर्‍याच आठवड्यात विशेष रस्ता अनूदानाचे 5 कोटी, वैशिष्ट पूर्ण योजनेचे 2 कोटी यांसह शहरातील स्मशानभूमी, जलतरण तलाव आदी कामांसाठीच्या मंजूर करवून आणलेला 11 कोटी 29 लाखाचा निधि देखील पालिकेकडून सा. बा.विभागाकडे वर्ग करवून आणला होता. त्याचे शल्य पालिकेतील सत्ताधार्‍यांना बोचत होते.

शेवटी शहराचा विकास करावयाचा असेल तर सत्तेशिवाय ते शक्य नसल्याने पालिकेतील सत्ताधार्‍यांमध्ये अस्वस्थता दिसत होती.

योगायोगाने 3 जून रोजी पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी शहरात येताच सर्व प्रथम साहेबराव पाटील यांच्या राजभवन निवासस्थानी भेट दिल्याने या राजकीय भेटीचे ‘राज’ वाढले होते.

दोन दादांमध्ये कोणत्या विषयावर चर्चा झाली? याचा अंदाज प्रत्येक नागरीक आपल्या पध्दतीने लावू लागला आहे. मी आमदार असतांना पालिकेची सत्ता आ.शिरिष चौधरी गटाकडे असतांनाही 147 कोटी निधी पालिकेला मिळवून दिला.

अशी बूद्धी विद्यमान आमदारांची का चालत नाही? असा तक्रारीचा सूर साहेबराव पाटील व समर्थकांनी पालकमंत्र्याकडे व्यक्त केला आणि यानंतरच खर्‍या अर्थाने राजकीय भूकंपाच्या चर्चेला उधाण आले.

भाजपा प्रवेशाबाबत पक्षाच्या उदयोन्मूख जिल्हा नेत्यां समवेत जामनेरकर नेत्यांची जळगांवला चर्चेची पहिली फेरी देखील झाल्याचे वृत्त आहे.

यात सकारात्मक चर्चा झाली. मात्र, पक्षाच्या जेष्ठ नेत्यांनी सबुरीचा सल्ला देवून वाघांच्या पिंजर्‍यात अडकू नका असे सांगितल्यचे समजते.

काही स्थानिक नेत्यांनी देखील याबाबत नकारघंटा पक्ष नेत्यांना कऴविली आहे. पक्षाला जिल्ह्यात पालिका निवडणूकीत चांगले यश मिळाले असतांना जिल्हाध्यक्षांच्या होम टाऊन मध्ये अपयश आले.

या निमित्ताने आता नगराध्यक्षांसह काही नगरसेवक जर पक्षात येत असतील तर जिल्ह्यातील पालिकेच्या आकडेवारीत एकाने वाढ होवू शकते व या निर्णायातून एका दगडात अनेक राजकिय पक्षांना घायल करता येवू शकणार असल्याने यासाठी उदयोन्मूख नेते जोरदार प्रयत्न करित असल्याची चर्चा संपूर्ण तालूक्यात आहे.

भाजपा प्रवेशाचा प्रश्नाला थेट उत्तर न देता काहीही होवू शकते, निर्णय घेण्यासाठी सर्वांना स्वातंत्र्य आहे. विकास होणार असेल तर भाजपा प्रवेशात काय वाईट आहे? अशी उत्तरे देवून भाजपा प्रवेशाच्या चर्चेला हवा देण्याचे काम साहेबराव पाटील यांनी केले आहे.

परिणामी राजकीय भुकूंप अटळ मानला जात असून त्यांचा मुहूर्त ठरणे तेवढे बाकी असल्याचे राजकीय जाणकारांना वाटत आहे.

 

LEAVE A REPLY

*