साहूर येथील शिवसेना जलआंदोलकांचा सत्कार

0
दोंडाईचा । दि.14 । वि.प्र- शेतकर्‍यांच्या सरसकट कर्ज मुक्तीसह विविध मागण्यांसाठी साहुर येथील शिवसैनिकांनी व शेतकर्‍यांनी तापी नदीच्या पाण्यात सतत 50 तास उभे राहून जल आंदोलन केले होते त्याचा सत्कार खा.संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आला.
कर्जमाफीसाठी दोंडाईचा शहरात शिवसैनिकांनी आवाहन केल्यावर कडकडीत बंद पाळण्यात आला होता. सरकारने दखल घेऊन सरकारने कर्जमुक्तीची घोषणा केल्याने जल आंदोलक, शेतकरी, पदाधिकार्‍यांचा खा. संजय राऊत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी खा.राऊत म्हणाले की, शिवसेनेत बाळासाहेबांना अपेक्षित शिवसैनिक मला तुमच्यात दिसून आले आहेत. असे सांगत शेतकरी व शिवसैनिकांना खा. राऊत यांनी शाबासकी दिली.

यावेळी पालकमंत्री ना. दादा भुसे, जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात, सहसंपर्क प्रमुख कारभारी आहेर, ग्रामीण जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे यांनी उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे, राकेश राजपूत, गणेश भदाणे, मयूर निकम, राजू रगडे, किरण सावळे, बबलू कोळी, गंगाराम शिरसाठ, रमेश सोनवणे, विलास कोळी, भुषण सोनवणे, योगेश सोनवणे, ज्ञानेश्वर पाटील, मनिलाल कोळी, छोटू सोळंकी, प्रशांत सुर्यवंशी,ईश्वर वाकडे, बाळा वाकडे कैलास सोनवणे, अशोक वाघ, दिनेश शिरसाठ, जयेश कोळी, भैय्या पाटील, गणेश ठाकरे मनोज कुवर, संजय मगरे, कैलास बोरसे यांचा सत्कार केला.

 

LEAVE A REPLY

*