सावेडीत दोन लाखाची घरफोडी

0

योगेश डोके यांच्या बंगल्यात धाडसी चोरी

अहमदनगर (प्रतिनिधी) – शहरातील सावेडी परिसरातील बंगल्याच्या मागील बाजूच्या खिडकीचे लोखंडी गज तोडून 2 लाख 36 हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा ऐवज चोरीस गेल्याची तक्रार योगेश मधुकर डोके यांनी पोलिसांकडे दिली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.
सावेडी परिसरात डोके यांचा परिमल नावाचा बंगला आहे. बुधवारी (दि.31) रात्री डोके हे बंगल्याच्या पुढील बाजूस झोपले होते. चोरट्यांनी बंगल्याच्या मागील बाजूस असाणार्‍या खिडकीचे लोखंडी गज तोडून घरात प्रवेश केला. 2 लाख 36 हजारांचे दागिने लंपास करून पोबारा केला. या घरफोडीत सोन्याचे गंठण, सोन्याचा हार, मिनी गंठण यासह अन्य वस्तू लंपास करण्यात आल्या आहेत. हा प्रकार 1 जूनला सकाळी निदर्शनास आल्यानंतर डोके यांच्या पोलिसांत धाव घेतली.

LEAVE A REPLY

*