सावाना पंचवार्षिक निवडणूक, माजी आ. बोरस्तेंकडून अध्यक्षपदासाठी अर्ज

अध्यक्षासाठी ४, उपाध्यक्षासाठी ६ अर्जार्ंची विक्री

0

नाशिक | दि.१० प्रतिनिधी- येथील सार्वजनिक वाचनालय (सावाना)चा सन २०१७ ते २२ साठी पंचवार्षिक निवडणुकीचा अध्यक्ष, उपाध्यक्ष व कार्यकारिणी मंडळासाठी अर्ज विक्री व स्विकृती सुरु झाली आहे. तीन्ही पदाच्या अर्ज स्विकृतीची १३ मार्च अंतिम मुदत असून आजपर्यंत कार्यकारिणी मंडळासाठी ३५, उपाध्यक्षासाठी ५ तर अध्यक्षपदासाठी ४ अर्जाची विक्री झाली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी माधवराव भणगे यांनी दिली.

विविध कारणांमुळे गेल्या काही दिवसापासून सावाना कारभार गाजत आहे. याच काळात निवडणुका जाहीर झाल्याचे सर्वाचे लक्ष त्याकडे लागले आहे. आतापर्यंत १५ जागांसाठी होणार्‍या कार्यकारिणी मंडळासाठी एकून ३५ अर्जाची विक्री झाली आहे. पैकी आज सर्वाधिक १६ अर्जाचा विक्री झाली. तर ८ उमेदरांनी आपले अर्ज निवडणुक अधिकार्‍याकडे दाखल केले आहे. उपाध्यक्ष आज पा. भा. करंजकर यांनी अर्ज घेतला. यापुर्वी या पदासाठी नरेश महाजन, यशवंत पाटील, संजय येवलेकर, सतीश बोरा, पी. वाय. कुलकर्णी, सी. जे. गुजराथी यांनी यांनी अर्ज घेतले आहे.

अध्यक्षपदासाठी आज एकही अर्जाची विक्री झाली नसली तरी यापूर्वी सतीश बोरा, पी. वाय. कुलकर्णी, सी. जे. गुजराथी, नानासाहेब बोरस्ते यांनी अर्ज घेतले आहे. कार्यकारीणी मंडळासाठी अर्ज घेतलेल्यांमध्ये नानासाहेब बोरस्ते, राजेंद्र जाधव, प्रमोद हिंगमिरे, संजय येवलेकर, अक्षय कलंत्री, मुंकुद बेनी, देवश्री देशमुख यांच्यासह इतरांचा समावेश आहे.

२ एप्रिल रोजी मतदान होणार असून यात १ हजार ७२४ अजीव तर १ हजार ८५६ सर्वसाधारण सभासद मतदानाचा हक्क बजावतील. १३ मार्च रोजी अर्ज स्विकृतीची मुदत संपणार असून गुरुवार (दि. १६) रोजी अर्ज छाननी होवून १७ रोजी वैध उमेद्वारांची यादी प्रसिद्ध होईल. १७ ते १९ मार्च दरम्यान उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत आहे. माघारीनंतर २० रोजी उमेदरांची अंतिम यादी प्रसिद्ध होईल. त्यानंतर २१ ला चिन्ह वाटप होणार असून आवश्यकता भासल्यास २ एप्रिल २०१७ ला सकाळी ९ ते सायंकाळी ५ यावेळेत मतदान होईल. तर सोमवार (दि. ३) एप्रिलला सकाळी १० वाजता मतमोजणी होणार आहे.

बोरस्तेंच्या एन्ट्रीने चुरस
निवडूक जाहीर झाल्यापासून पॅनल निर्मितीला वेग आला आहे. यातच माजी आमदार नानासाहेब बोरस्ते यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज घेतल्याने निवडणुकीत अधिक चुरस निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अर्ज दाखल करण्यासाठी अजूनही ३ दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने अध्यक्षपदासाठी आणखी किती अर्ज येतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. असे असले तरी पॅनल निर्मिती आणि माघारीनंतरच पुढील चित्र स्पष्ट होणार आहे.

LEAVE A REPLY

*