‘सावाना’ निवडणूकीत रंगत ; ग्रंथमित्र पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ

0

नाशिक  : सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू असलेल्या सार्वजनिक वाचनालयाच्या निवडूक प्रचार रंगात आला आहे. बुधवारी जनस्थान पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ झाल्यानंतर आज ग्रंथमित्र पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ झाला. प्रचाराला जोर आल्याने संपूर्ण साहित्य क्षेत्राचे लक्ष या निवडूकीकडे लागले आहे.

सावानाच्या प्रवेशद्वाराजवळ एका सजवलेल्या पालखीमध्ये ज्ञानेश्वरी, संत नामदेव गाथा, संत तुकाराम गाथा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बोल महामानवाचे हा नरेंद्र जाधव यांनी लिहिलेला ग्रंथ, कुसूमाग्रजांचा विशाखा हा काव्यसंग्रह आणि प्रा. वसंत कानेटकर लिखीत साहित्यवेध ग्रंथ ठेवण्यात आले होते.

प्रारंभ सरस्वती, कुसूमाग्रज प्रा. वसंत कानेटकर, विमादी पटवर्धन, स्व. मु. श. औरंगाबादकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर सजवलेल्या पालखीत ठेवलेल्या ग्रंथाचे पूजन करण्यात आले. सावानाचे माजी अध्यक्ष मधुकर झेंडे यांच्या हस्ते नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पॅनलतर्फे ज्येष्ठ साहित्यिक एन. एम. आव्हाड, प्रभाकर बागुल, अभिमन्यू सुर्यवंशी, प्रा. गंगाधर अहिरे, रेखा भांडारे, शारदा गायकवाड यांचा प्रतिनिधीक सन्मान करून साहित्यिकांना वंदन करण्यात आले.

प्रसंगी विजय हाके, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, सुभाष सबनीस, श्रीकृष्ण शिरोडे, शिरीष राजे, अनिल देशपांडे, सतीश करजगीकर, शाम दशपुत्रे, सुरेश राका, रमेश कडलग, प्रमोद हिंगमिरे, लक्ष्मीकांत भट, अनिल नहार, रामेश्वर कलंत्री, श्रीपाद कुलकर्णी, राजेंद्र महाले, नंदू हरकुट, शरद काळे, अल्हाद वाघ, किशोर अहिरराव, विजय पवार, प्रविण मारू, दिलीप तांबट, अविनाश वाळुंजे, नंदू वराडे, यु. के. अहिरे, योगाचार्य अशोक पाटील आदिसह पॅनलचे उमेदवार प्रा. विलास औरंगाबादकर, किशोर पाठक, नानासाहेब बोरस्ते, प्रा. डॉ. शंकर बोर्‍हाडे, श्रीकांत बेणी, वसंत खैरनार, शंकरराव बर्वे, अ‍ॅड. अभिजित बगदे, देवदत्त जोशी, गीरीश नातू, जयप्रकाश जातेगांवकर, प्राचार्य डॉ. वेदश्री थिगळे, प्राचार्य संगीता बाफना, प्रांचार्य डॉ. धर्माजी बोडके, बी. जी. वाघ, संजय करंजकर, अ‍ॅड. भानुदास सौचे, उदयकुमार मुंगी आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*