पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत सायबर पोलीस ठाण्याचे आज उद्घाटन

0
नाशिक | दि. ३० प्रतिनिधी – शासनाच्या निर्णयानुसार प्रत्येक पोलीस आयुक्तालयात सायबर पोलीस ठाणे तयार करण्यात आले आहे. नाशिकचे सायबर पोलीस ठाणे सज्ज झाले असून उद्या दि.१ पालकमंत्र्यांच्या उपस्थित याचे उद्घाटन होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

पोलीस आयुक्तालयातील सायबर सेल कक्षात याचे उद्घाटन उद्या सकाळी दहा वाजता पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, आमदार बाळासाहेब सानप, प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे यांच्यासह उपायुक्त दत्तात्रय कराळे, विजय पाटील, श्रीकांत धिवरे, लक्ष्मीकांत पाटील उपस्थित राहणार आहेत.
शहरात दिवसेंदिवस चोर्‍या, हाणामार्‍या, खून, घरफोड्या यासारख्या गुन्ह्यांध्ये वाढ होत असताना आता या गुन्हेगारीपेक्षाही ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यासाठी पोलीस आयुक्तालयामध्ये यापूर्वीची सायबर सेल उभारण्यात आला आहे.

त्यामार्फत ऑनलाईन आर्थिक फसवणूक, सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी, अश्‍लिलता यासारखेही गुन्ह्यांचा तपास सायबर सेलच्या माध्यमातून केला जात होता. त्यातून स्वतंत्र सायबर पोलीस ठाण्याची गरज व्यक्त केली जात होती. त्यासाठी काही महिन्यांपूर्वी पोलीस महासंचालकांनी राज्यातील पोलीस आयुक्तालयांना तात्काळ सायबर पोलीस ठाणे सुरू करण्यासाठीचे आदेश दिले होते.

अखेरीस पोलीस आयुक्तालयातून सुरू असलेले सायबर सेलचे कामकाज, त्याच ठिकाणी स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे सुरू करण्याचे निश्‍चित झाले. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पवार यांच्या नेतृत्वाखाली ३५ पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांचा वर्ग या सायबर पोलीस ठाण्यासाठी निश्‍चित करण्यात आला असून त्याचे कामकाज अंतिम टप्प्यात आहे.

LEAVE A REPLY

*