सायना नेहवालच्या घरी पोहोचली श्रद्धा कपूर!

0

अभिनेत्री श्रद्धा कपूर लवकरच बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिच्यावर आधारित बायोपिकमध्ये सायनाची भूमिका साकारताना बघावयास मिळणार आहे.

या भूमिकेसाठी श्रद्धा प्रचंड मेहनत घेत असून, बॅडमिंटनचे धडे खुद्द सायनाकडून घेत आहे.

काही दिवसांपूर्वीच दोघींचे कोर्टवरील फोटो समोर आले होते.

श्रद्धा सायनाच्या हैदराबाद येथील घरी पोहचली असून, तिने सायनाबरोबरच तिच्या आई-वडिलांचीही भेट घेतली आहे.

यावेळी श्रद्धाने सायनाच्या फॅमिलीसोबत लंच केले, तसेच सायनाचा घरातील वावर कसा असतो, याविषयीची माहितीही जाणून घेतली.

LEAVE A REPLY

*