Type to search

अग्रलेख संपादकीय

सामने वेळेत संपत नसल्याने सगळ्यांचेच हाल

Share
नवी दिल्ली । सामने मध्यरात्रीनंतरही लांबत असल्यामुळे अनेकदा प्रेक्षकांना सामना मध्येच सोडून घरी परतावं लागतंय.
सलग पाच दिवस चालणारे कसोटी सामने आणि दिवसभर चालणारे एकदिवसीय सामने, यामुळे क्रिकेटचा खेळ इतर खेळांच्या तुलनेत धिमा वाटायला लागला होता. अशावेळी सध्याच्या कसोटी खेळणार्‍या 9 देशांच्या पलीकडे खेळाला पोहोचवणं, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद किंवा खउउ कठीण जात होतं.

2007 मध्ये झालेला पहिला वहिला ढ20 विश्वचषक प्रेक्षकांमध्ये सुपरहिट झाला. आणि क्रिकेटच्या नव्या पिढीसाठी खेळाचं भविष्य ठरून गेलं. भारतात तर क्रिकेटचीच लोकप्रियता अमाप. त्यामुळे भारताने ढ20 क्रिकेट आणखी एनकॅश करत 2008 मध्ये या प्रकारावर आधारित एक लीग सुरू केली – इंडियन प्रीमिअर लीग किंवा खझङ. प्रथमश्रेणी दर्जाची ही लीग जगभरातल्या खेळाडूंमध्ये आणि क्रिकेट चाहत्यांमध्ये आपलं स्थान टिकवून आहे.

इथं फलंदाज बर्‍याचदा चौकार आणि षटकारांचीच भाषा बोलतात, गोलंदाजही चौकार दिले तरी बेहत्तर पण, पुढच्या चेंडूवर विकेट घेईन या आवेशाने गोलंदाजी करतात. मैदानावर ही आतषबाजी तर मैदानाबाहेर चिअर लीडर्सचा जल्लोष. आणि सामन्यांना बॉलिवुड, टॉलीवुड, बडे उद्योगपती यांची हजेरी. या सगळ्यामुळे या स्पर्धेला वेगळंच ग्लॅमर प्राप्त झालं.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!