Type to search

आवर्जून वाचाच विशेष लेख

सापडणार नाही, आनंद शोधावा लागतो!

Share

मित्रांनो, आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण सर्वत्र पाहतोय की, सर्विकडे सार्‍यांची एकच धडपड दिसतेय मला आनंदाची प्राप्ती कोणत्या मार्गाने मिळेल. खरं तर माणसाने जेव्हापासून या निसर्ग देवतेच्या विरोधात आपली जीवनशैली बदलवलीय ना मुळात तेव्हापासूनच मानव अडचणीत आला आहे. एक साधी गोष्ट आहे या भूतलावर जसे इतर प्राणी व पक्षी आहेत तसेच मानव पण ‘मानव प्राणी’ आहे, फक्त काय तर माणसाला म वाचा शक्ती मदेऊन आपले मत बोलून दाखवण्याची बोनस क्लिप दिलीय दुसरं काही नाही. बाकी सगळं सारख,मग एक सांगा कोणता प्राणी वा पक्षी कधी विचार करतांना का टेंशन घेतांना दिसला का? त्याचं उत्तर म्हणजे नाही. त्यांनी निसर्गाच्या विरोधात कधीही न जाता त्या नियमांनी वागतोय. म्हणून ते प्रसन्न व निरोगी जीवन जगताय.

आज आपण पाहतोय मनुष्य हा समाजात फिरतांना सोबत वेगवेगळे मुखवटे घेऊनच फिरत असतो, कारण त्याला परिस्थिती नुसार मुखवटे चढवावे लागताय.कारण आनंद शोधावा लागतोय.आपण जर पूर्वीचा काळाचा विचार केला तर, पूर्वी माणसे एकमेकांना सहज भेटली ना तरी मनापासून ‘राम राम’ म्हणायचे. त्यात आनंद होता. आजी आजोबांच्या आडोश्याला नातवंडे खेडायचे त्यात आनंद होता. शाळेच्या दप्तराचे ओझं नाही की भरमसाठ फी नाही यात आनंद, झाडामाडावर, नदीनाल्यात डुबक्या मारणे, गोट्या भोवरे, विटीदांडू खेळणे यात आनंद होता आणि तोही विनामूल्य ! तो शोधावा लागत न्हवता कारण त्यात सहजता होती. आणि ज्याच्यात सहजता असते ना त्याला जास्त कष्ट पुरत नाही. म्हणून वर्षानुवर्षे डॉक्टर कडे जाण्याची गरज नसायची. आता जितकी आजारांची भाऊबंदकी वाढलीय तशी त्यावेळेस न्हवती. त्यावेळेस ही विज्ञान होते, मात्र ते वरदान म्हणून आता तर विज्ञान शाप ठरतंय.बाह्यदृष्ट्या मनुष्य जितका तंदुरुस्त वाटतोय न तो मुळात आतून नाही. कारण त्याला वेगवेगळ्या कारणांनी ग्रासलंय. समस्या त्यांनीच निर्माण करून ठेवलीत. डोळ्यातले अश्रू लपवून जगतोय कारण बाहेर दाखवता येत नाही प्रतिष्ठा मध्ये आडवी येते.म्हणून तर म्हणतो की, आनंद शोधावाच लागेल.

काय दिनचर्या बनलीय आपली पहा न, सकाळी उठायला अलार्म, दोन पाऊल चालायला व्हीलचेअर , पहिला श्वास घ्यायला गोळी, जेवण पचवायला गोळी, पुन्हा रात्री झोपायला सुद्धा गोळी लागतेय. तुम्ही सांगा कोणता आनंद आहे आपल्या जीवनात, कधी कधी असं म्हणावसं वाटतं की, माणूस फक्त मरण्यासाठी जगतोय का काय!

आनंद मिळवायचा असेल तर तो कशातही मिळवता येतो.गेल्या आडवड्यात वृत्तपत्र मध्ये वाचण्यात आलं, राजस्थान मध्ये एका नामांकित डॉक्टरांनी चक्क बिबट्याच्या चार पिलांना त्यांच्या ममतेच प्रेम देऊन परिसराला अचमबीत केलं. कारण असे की, पिलांचा आईचा अन्य बिबट्याच्या हल्ल्यात गँभीर जखमी होऊन मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्या चार पिलांची काळजी घेतली तर ते चार दिवसांपासून उपाशी होते. अमेरिकेहून दूध आणून त्यांना पाजलं.आज त्या पिलांना त्यांचा इतका लळा लागलाय की, ते रात्रीही त्यांच्या जवळ झोपतात.सांगण्याचा उद्देश हा की प्रेम लावलं तर जंगलातल पाखरू ही जवळ येतं असं म्हणतात ते खोटं नाही. याउलट आपण आपण जीवनशैली बदलून टाकलीय स्वतः च्या मुलांना वेळ द्यायला आपल्याकडे वेळ नाही.

इंटरनेटच्या माया जाळ्यात आपण पूर्ण गुरफटलोय त्याच्याशिवाय आपल्याला काहीच दिसत नाही. सकाळी उठल्याबरोबर हजारो मेसेज गुडमॉर्निंगचे धडकतात; पण प्रत्यक्षात अबोला. माणसांचे बोलणं कमी झालंय. फुटाचा माणूस इंचाच्या मोबाईल मध्ये सीमित झालाय. आता सुटका नाही.

म्हणून आता उर्वरित जीवन जर आनंदात जगायचं असेल न तर आनंद शोधावा लागेल कशात तर, समोरच्यालाही भावना आहेत असे वागा, त्याला ही जीवन जगण्याचा अधिकार आहे, आपल्या घासातनं एक घास भुख्यालाना द्या, समोरच्याची वेदना ही माझी वेदना आहे असे समजा, पैसा सर्वकाही आहे असे मुळीच समजू नका. आणि सर्वात महत्त्वाचे की, निसर्ग नियमांनी वागा. एवढ्या गोष्टीही आत्मसात केल्यात तरी जीवनात आनंद उरूनपुरुन निघेल यात यत्किंचितही शँका नाही.
मो. 7588580710
परमेश्वर रोकडे, धरणगाव

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!