Type to search

धुळे

साथीचे आजार रोखण्यासाठी कृती आराखडा

Share

धुळे । शहरात विविध साथीचे आजार उद्भवू नये म्हणून कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. साथीच्या आजारांबाबत जनजागृती व प्रबोधन करण्यात येईल अशी माहिती महापौर चंद्रकांत सोनार यांनी दिली.

पावसाळ्यात विविध साथीचे आजार उद्भवू नये यासाठी उपाययोजना करण्यासाठी अधिकार्‍यांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी महापौर सोनार हे बोलत होते.

जुन ते नोव्हेंबर हा डासांचा पारेषन काळ असल्याने डासांच्या उत्पत्तीत वाढ होते. संभाव्य साथीच्या आजारांचा प्रादूर्भाव वाढू नये याची दखल घेण्यात आली असून त्यासाठी आरोग्य विभागाची टीम तयार करण्यात आली आहे. त्यात एक मलेरिया निरीक्षक, तीन आरोग्य सहाय्यक, नऊ एमपीडब्ल्यू, एक किटक संहारक, दोन खाजगी दवाखान्यातून संशयीत डेंग्यू रुग्णांची माहिती घेण्यासाठी कर्मचारी, दहा अळी नाशक फवारणीसाठी, चार धुरळणीसाठी कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शहरात घरोघरी फिरुन घरगुती पाणीसाठा तपासणी, दुषित पाणीसाठे रिकामे करणे, कंटेनर सर्व्हेक्षण, अ‍ॅबेटींग करण्यात येणार आहे. तसेच साथीच्या आजारांबाबत जनजागृती व प्रबोधन करण्यात येईल.

उपलब्ध कर्मचार्‍यांकडून सकाळ व दुपारच्या सत्रात आरोग्य विभागाचे काम पुर्ण क्षमतेने करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक तो कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. तर मनपा व कंत्राटी कर्मचार्‍यांनी गणवेश व ओळखपत्र परिधान करणे आवश्यक आहे. कर्मचार्‍यांनी काम चुकारपणा केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशाराही महापौरांनी दिला आहे.

दि. 19 जुलै रोजी सकाळी 7.30 वाजता प्रायोजित तत्वावर देवपूर दवाखानानजीक प्रात्याक्षिके करण्यात येणार आहे.

या बैठकीला सहाय्यक आयुक्त शांताराम गोसावी, उपमहापौर सौ. कल्याणी अंपळकर, स्थायी सभापती युवराज पाटील, हिरामण गवळी, नागसेन बोरसे, विजय जाधव, अन्सारी वसीम, मलेरिया विभागाचे राजेश वसावे आदी उपस्थित होते.

डेंग्यू व साथीच्या आजाराबाबत जनजागृती करण्यात यावी. नागरिकांनीही आपल्या कुटुंबाची व परिसराची स्वच्छता ठेवून आराजाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काळजी घ्यावी असे आवाहन महापौरांनी केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!