सातबारा कोरा करा !

0
पाचोरा। दि. 12। प्रतिनिधी-तत्वतः कर्ज माफी नव्हे तर सरसकट कर्ज माफी झालीच पाहीजे. फडणवीस सरकारची कर्ज माफी शेतकर्‍यांना संभ्रमात टाकणारी असुन ही घोषणा टोपी घालणारी आहे.
शिवसेना सरकारच्या कानाखाली वाजवित असल्याने मुख्यमंत्र्यांना कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला. शिवसेना रस्त्यावर उतरली नसली तर कर्ज माफी झालीच नसती.
पंतप्रधान व मुख्यमंत्री विरोधकांची भुमिका निभावत असतांना कर्ज माफीची भाषणे करीत होते. व काँग्रेसच्या पापी सरकारला पाडायची भाषा वापरत होते.
पंतप्रधानांचे बुडबुडे फुटायला लागले आहेत. कर्ज माफीचे आंदोलन संपले नसुन व सरसकट कर्ज माफी साठी जुलै महिन्यात लाखो शेतकर्‍यांचा निर्णायक मोर्चा विधानभवनावर धडकणार आहे.
तसेच शिवसेनेला संपविणार्‍यांच्या तिरडीला खांदा देवून त्यांना गाडले असुन उद्याची सत्ता ताब्यात घेण्यासाठी व उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज राहण्याचे संकेत सेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी फडणवीस व मोदी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर घणाघाती भाषणकरुन पाचोरा येथील शेतकरी मेळाव्यात राजकीय भुकुंपाचा संकेत दिला.

यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख रविंद्र मिर्लेकर, ना. गुलाबराव पाटील, मा. आ.चिमणराव पाटील, आर.ओ.तात्या पाटील, चंद्रकांत सोनवणे, गुलाबराव वाघ, दिलीप दळवी, सौ. महानंदाताई पाटील, जळकेकर महाराज, जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील, नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष श्री. शरद, जि.प. सदस्य रावसाहेब पाटील, पदमसिंग पाटील, दिपक राजपूत, अ‍ॅड. दिनकर देवरे, पप्पू राजपूत, किशोर नारावकर, मुकुंद बिल्दीकर, रमेश बाफणा, विकास पाटील, भुराआप्पा, अरुण पाटील, डॉ. भरत पाटील, न.पा. नगरसेवकांसह पाचोरा भडगांव तालुक्यातील सेनेचे आजी माजी पदाधिकारी, शेतकरी व शिवसैनिकांची उपस्थिती होती.

प्रास्ताविक भाषणात आ. किशोर पाटील यांनी कर्जमाफी नव्हे तर संपूर्ण कर्ज मुक्तीसाठी शिवसेनेचा लढा असून पक्षप्रमुखांचा निर्णायक आदेश मिळेपर्यंत हा लढा सुरुच राहणार आहे. हे सरकार सहकारक्षेत्र मोडकीस काढण्याचे राजकारण करीत आहे. शेतकर्‍यांना सरसकट कर्ज विक्री झालीच पाहीजे.

ना. गुलाबराव पाटील यांनी सरकारच्या तत्वतः कर्ज माफीची खिल्ली उडवित शिवसेनेचाही भाजपाला तत्वतः पाठींबा असल्याची कोरखळी मारली. जेव्हा केव्हा शेतकरी अडचणीत तेव्हा शेतकरी आत्महत्या प्रश्नांवर शिवसैनिक रत्यावर उतरला. कपाळ करंट्या जिल्हा बँकेने शेतकर्‍यांवर दरोडेचे गुन्हे दाखल केले. पक्ष प्रमुखांच्या आदेशावर व बाळासाहेबांसारख्या दैवतावर विश्वास ठेवणारी शिवसेना शेतकर्‍यांच्या सरसकट कर्जमुक्तीच्या लढ्याच्या आदेशाची वाट पहात आहे.

जिल्हा संपर्क प्रमुख भाषणात म्हणाले की 35 वर्षापासून शेत कामांच्या प्रश्नांवर त्यांच्या पाठीशी उभा राहणारा एकमेव शिवसेना पक्ष आहे.

कर्जमुक्तीचा शिवसेनेचा नारा असुन राजकिय भुकंपाच्या वक्तव्याला घाबरुन देवेंद्र फडणविसांना कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला.

तिन वर्षात साडेचार हजार शेतकर्‍यांच्या आत्महत्या झाल्या. त्यांचेच पैसे बँकेत मिळत नाहीत. हे आंदोलन तात्पुरते थांबले असले तरी पुढच्या कामाच्या लढ्यासाठी शिवसेना सज्ज आहे.

शिवसेनेची बुलंद व बेधडक तोफ खा. संजय राऊतांनी भाजपाराज्य व केंद्र सरकारवर शाब्दीक हल्ले चढवितांना मुख्यमंत्र्यांना राजकिय भुकंपाचे संकेत दिले.

राज्याची सत्ता ताब्यात घेण्यासाठी व उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यासाठी व जुलै महिन्यातल्या निर्णायक लढ्यासाठी सज्ज रहावे असे आदेश देवून शेतकर्‍यांची सरसकट कर्ज मुक्ती झाली नाहीतर भुकंपाचा केंद्र बिंदु केव्हा कुठे सरकेल सांगता येत नाही.

असे विधान करुन देवेंद्र फडणविस सरकारला राजकिय धक्के देणारा ईशारा दिला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नाना वाघ यांनी तर आभार गणेश पाटील यांनी मानले.

LEAVE A REPLY

*