सागरी मार्गावर देशांचे आर्थिक गणित अवलंबून – व्हा.ऍडमिरल सुनिल भोकरे

0

चाळीसगाव, | प्रतिनिधी :  जगातील सर्वांत महत्वाचे समुद्र मार्ग भारतातून जातात, आपल्या देशात ९० टक्के व्यापार हा समुद्र मार्गानेच होते. त्यामुळे जगातील सर्वात मोठे व्यापारांच्या किमती ह्या समुद्र मार्गावरुन ठरत असल्यामुळे समुद्रा मार्गावर देशांचे आर्थिक गणित अवलबुंन असल्याची माहिती भारतीय नौदलाचे व्हाईस ऍडमिरल सुनिल भोकरे यांनी त्यांच्या गौरव सोहळ्या प्रसंगी सांगीतली.

भारतीय नौदलाच्या व्हाईस ऍडमिरल पदी सुनिल भोकरे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा चाळीसगाव येथील राष्ट्रीय महाविद्यालयात नागरी गौरव समितीच्यावतीन  गौरव सोहळा आयोजित करण्यात आल होतो.

यावेळी व्यासपीठावार जलसंपती मंत्री गिरीष महाजन, आमदार उन्मेष पाटील, माजी आ.राजीव देशमुख, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अस्तिक कुमार पांडे, प्रांताधिकारी शरद पवार, वाणी समाजाचे अध्यक्ष शरद मोरणकर आदि मान्यवर उपस्थित होते.

व्हॉ.ऍड.सुनिल भोकरे पुढे म्हणाले की, नेव्ही मध्ये दुसर्‍यांना सेवा(सव्हीसेस) कशी द्यायाची हे चांगल्या पद्धतीने शिकविले जाते. त्यासाठी ज्यावेळेस सर्व मार्ग संपतात त्यावेळेस आर्म फोर्सला मदतीसाठी बोलविले जाते. भारत हा जगातील नौदलामध्ये सर्वांत महत्वाच देश आहे.

त्यामुळे एका समुद्राला आपल्या देशांचे नाव(इंडियन ओशन) देण्यात आल्याचे त्यांनी सांगीतले. तसेच त्यांनी भूदल, वायुदल आणि नौदला विषयी सविस्तर माहिती उपस्थिताना दिली, व जास्ती-जास्त तरुणांनी आर्म फोर्समध्ये येण्यासाठी प्रामाणिकपणे मेहनत करण्यांचे आवाहन केले. शालेय शिक्षण ते व्हाईस ऍडमिरल पदापर्यंचा त्यांच्या खडतर प्रवासाबद्दलची माहिती यावेळी त्यांनी सांगीतली.

१९७० नतंर प्रथमच गुढीपाडवा परिवारासोबत

व्हॉ.ऍड.सुनिल भोकरे यांनी त्यांच्या चाळीसगावातील आठवणीना उजाळा देत भाषाणाच्या सुरुवातीलाच १९७० नतंर प्रथमच गुढीपाडवा परिवारासोबत साजरा करत असल्याचे सांगीतले. तसेच आई-वडीलांच्या आर्थिक परिस्थिती सतत जाणीव ठेवल्यामुळेच मी यशस्वी होऊ शकल्याचेही ते म्हणाले. प्रत्येक आई-वडीलाचा बोडींग स्कूल बाबत गैरसमाज असतो. परंतू माझा जिवनाला बोर्डींग स्कूलमुळेच कलाटणी मिळल्याचे सांगत, बोर्डींगमुळे शिस्त लागत असल्याचेही त्यांनी आर्वजुन सांगीतले.

प्रामाणिपणे काम केले तर यशस्वी-

व्हॉ.ऍड.सुनिल भोकर यांनी पाण्याखालील पाणपुडीतील खिस्से सांगत, संकटात लिडर शिपची कसरत लागत असल्याचे सांगीतले. पाणबुडीत असताना पाणबुडीचे इंजिन खराब झाल्याच व सहकार्यांचा ऑपरेशनचा प्रसंग सांगताना, त्या संकटाला खबीरपणे हसत-खेळत समोरे गेल्याचे सांगत. तुम्ही प्रमाणिपणे कामे तर तुम्ही नक्की यशस्वी होणार असल्याचेही ते म्हणाले. यावेळी उपस्थित विद्यार्थांनी नेव्हीत कसे जाता येईल, आर्म फोर्स बद्दलची माहिती बद्दल विचारलेल्या प्रश्‍नाना भोकरे यांनी माहितीपर उत्तरे दिलीत.

प्रत्येक माणसात देशभक्त- मंत्री गिरीष महाजन

चाळीसगाव ही रत्नाची खान आहे, आणि त्यातून सुनिल भोकरे सारखे माणसे निर्माण होत असतात. मोठ्या पदावर जाऊन मातीशी नाळ असलेली माणसे खुप कमी असतात, त्यातील सुनिल भोकरे हे एक आहेत. प्रत्येक माणसात देशभक्ती असते, फक्त प्रत्येकांने आपली जबाबदारी प्रामाणिक व चोख पार पाडली पाहिवी, असे यावेळी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी सांगीतले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, पैसा कमाऊन माणसे मोठे होत नाहीत, तर देशसेवा करुनच माणसे मोठी होतात. आजही आर्म फोर्सचा माणुस पाहिल्यावर आपल्या मनात त्यांच्याबद्दल एकवेगळी गर्वाची भावना निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगतीले.

वरखेडे धरणासाठी १०० कोटी-

येत्या दिडवर्षांत वरखेडे धरण पूर्ण करणार असून त्याच्यासाठी १०० कोटी रुपय देणार असल्याचे यावेळी गिरीष महाजन यांनी सांगीतले. तसेच स्वता;च्या फिडनेसचे राज सागंत आजी-माजी आमदरांनी तब्येत कमी करण्यांचा सल्ला यावेळी गिरीष महाजन यांनी दिला. यावेळी उपस्थितांमद्ये हशा फिकला होतो.

आदर्श घेऊन समाज घडविण्यांचा प्रयत्न-आ.पाटील

व्हॉ.ऍ.सुनिल भोकर यांचा आदर्श घेऊन, चांगला समाज घडविण्यासाठी आम्हाल प्रेरणा मिळणार असल्याचे यावेळी मनोगत व्यक्त करतांना आमदर उन्मेष पाटील यांनी सांगीतले. गौरव सोहळ्याचे प्रास्ताविक सी.सी वाणी यांनी केले तर सुत्रसंचालन गंगापूरकर यांनी केले. यावेळी सर्व क्षेत्रातील मान्यवर व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

LEAVE A REPLY

*