Type to search

धुळे

साक्रीत वादळीवार्‍यासह मुसळधार पाऊस

Share

साक्री । साक्री तालुक्यात अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने शनिवारी रात्री विजांचा कडकडाट, वादळीवार्‍यांसह दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे. तालुक्यात सर्वात जास्त पावसाची नोंद माळमाथा भागातील दुसाने परिसरात झाली आहे.

तालुक्यात गेल्या दीड महिन्यापासून पावसाअभावी जनता हवालदिल झाली होती. काही प्रमाणात शेतकर्‍यांनी खरीप पिकाची पेरणी केली. मात्र पाऊस पडला नसल्याने पिके करपून गेली आहेत. तर काही ठिकाणी दुबार पेरणी करावी लागणार आहे. निम्यापेक्षा जास्त क्षेत्र पेरणीचे बाकी असून काल झालेल्या दमदार पावसाने शेतकर्‍यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. सुमारे एक ते दीड तास पावसाने झोडपून काढल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. कोरड्या ठणठणीत झालेले नदी, नाले पावसाने वाहून निघाले. विजांचा कडकडाट, तुफानी वारा आणि पावसाची दमदार हजेरी यामुळे तालुक्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पावसामुळे कुठेही जिवीतहानी किंवा नुकसान झाल्या संदर्भातील माहिती महसूल विभागाकडून मिळाली नाही. काल साक्रीत 57 मि.मी, कासारे 52, निजामपूर 31, दुसाने 125, म्हसदी 55, पिंपळनेर 46, ब्राह्मणवेल 55, उमरपाटा 41, कुडाशी 54, दहिवेल 85, असा एकूण तालुक्यात 60.1 मि.मी(141.6) पावसाची शासकीय नोंद करण्यात आली आहे. शनिवार रात्री मुसळधार पाऊस झोडपत असतांना साक्री शहरातील उपनगरांनमधे विज वितरण कंपनीचे वीज रोहित्राचा स्फोट झाला. यामुळे रात्री दोन वाजेपासून तर रविवारी दुपारी दोन वाजेपर्यंत शहरातील वीज पुरवठा खंडित झाला होता. यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!