साकूरला वादळी वार्‍यामुळे लग्नाचा मंडप कोसळला

0

साकूर (वार्ताहर) – संगमनेर तालुक्यातील साकूर येथे काल शनिवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास प्रचंड वादळी वारे झाले. या वादळी वार्‍याचा फटका आश्रमशाळेच्या मैदानावर आयोजित केलेल्या लग्नसमारंभास बसला. लग्नसमारंभाकरिता उभारण्यात आलेला मंडप वादळी वार्‍यामुळे कोसळला.

 
यामध्ये मंडपवाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. साकूर येथील आश्रमशाळेच्या प्रांगणात काल शनिवारी पोखरकर व बारवे यांचा शुभविवाह संध्याकाळी 7 वाजता आयोजित करण्यात आला होता. लग्नसमारंभाकरिता भव्य विद्युत रोषणाई व ताजमहाल सारखे डेकोरेशन तसेच भोजन मंडप, पाक मंडप उभारण्यात आला तर बसण्यासाठी खुर्चा मांडण्यात आल्या होत्या. दरम्यान दुपारी 4 वाजेच्या सुमारास प्रचंड वादळी वारे झाले. या वादळी वार्‍यामुळे उभारण्यात आलेल्या मंडप क्षणात कोसळला. मंडपाचे कापड फाटून मोठे नुकसान झाले तर विद्युत रोषणाईचे दिवे फुटले. सुदैवाने कुठलीही जीविहानी झाली नाही. अचानक झालेल्या वादळी वार्‍यामुळे लग्नसमारंभासाठी आलेल्या वर्‍हाडी मंडळींची धांदल उडाली.

 

 
गेल्या सात दिवसांपासून हे मंडप उभारणीचे काम सुरु होते. मात्र काही क्षणांत मंडप खाली कोसळला. दुपारी वर्‍हाडी मंडळीने मंडपात भोजन घेतले. त्यावेळी जर वादळी वारे झाले असते तर मोठी हानी झाली असती. सुदैवाने ही हानी टळली. दरम्यान 4 वाजेनंतर पावसाने सतंतधार सुरुच ठेवली होती.

LEAVE A REPLY

*