‘साईनाथ’साठी 96 कोटींचे साहित्य खरेदीस मान्यता

0

कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल ः खरेदी समितीच्या बैठकीत निर्णय

 

शिर्डी (प्रतिनिधी)- साईबाबा व साईनाथ रुग्णालयाकरिता सन 2017 ते 18 या कालावधीसाठी वार्षीक औषधे, सर्जिकल आदी साहित्य खरेदीकामी सुमारे 55 कोटी 91 लाख 91 हजार रुपये खर्चाच्या निवेदेला साईबाबा संस्थानच्या खरेदी समितीची मान्यता मिळाल्याची माहिती कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल यांनी दिली.

 
या सभेस विश्‍वस्त सचिन तांबे, नगराध्यक्षा सौ. योगीताताई शेळके, संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी डॉ. संदीप आहेर, प्रशासकीय अधिकारी सूर्यभान गमे, दिलीप उगले, उत्तम गोंदकर, अशोक औटी, वैद्यकीय संचालक डॉ. विजय नरोडे आदी उपस्थित होते.

 

यावेळी श्रीमती अग्रवाल म्हणाल्या, साईबाबा व साईनाथ रुग्णालयाकरिता सन 2017 ते 18 या कालावधीसाठी वार्षिक औषधे, सर्जिकल साहित्य आदी साहित्य खरेदीकामी सुमारे 55 कोटी 91 लाख 91 हजार रुपये खर्चाच्या, साईनाथ रुग्णालयातील प्रयोगशाळा या विभागाकरिता फुल्ली टोमॅटीक बायो केमिस्ट्री नालायझर मशिन खरेदीकामी सुमारे 15 लाख रुपये खर्चाच्या, साईबाबा व साईनाथ रुग्णालयातील विविध विभागाकरिता हॉस्पिटल व कार्यालयीन फर्निचर खरेदीकामी सुमारे 12 लाख 34 हजार रुपये खर्चाच्या, साईबाबा हॉस्पिटलमधील न्युरो आय.सी.यू. या विभागाकरीता मल्टिपॅरा मॉनिटर खरेदीकामी सुमारे 3 लाख 25 हजार रुपये खर्चाच्या व साईनाथ रुग्णालयातील ब्लड बँक या विभागाकरिता रेफ्रिजरेटर ब्लड बॅग सेंट्रीफ्युग मशिन जुने बायबॅक करून नवीन खरेदीकामी सुमारे 1 लाख 45 हजार रुपये खर्चाच्या तांत्रिक निविदा उघडण्यात आल्या. तर कार्यालयीन वापरासाठी लॅपटॉप, आयपॅड व कलर लेझर प्रिंटर खरेदीकामी सुमारे 2 लाख 38 हजार रुपये खर्चाच्या वाणिज्यीक निविदा उघडण्यात आल्या.

 

या उघडण्यात आलेल्या निविदा पुढील कार्यवाहीसाठी उपसमितीच्या सभेपुढे सादर करण्यात येणार असल्याचेही श्रीमती अग्रवाल यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*