सांगवीत विद्यार्थ्याची आत्महत्त्या

0

पारोळा |  श.प्र. :  तालुक्यातील सांगवी येथील इयत ९ वित असलेल्या १५ वर्षीय विद्यार्थ्याने रहाते घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली.

कुणाल प्रकाश पाटील याने दि.१४ रोजी दुपारी ३ वाजता त्याच्या रहाते घराच्या वरच्या मजल्यावर ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केली.तो पारोळा येथील केशव माध्य.विद्यालयात इयत्ता ९ वीत शिकत होता.

त्याची मोठी बहीण काकाकडे ठाणे येथे इंजिनियरीगला शिकत असतांना ती नापास झाल्याने तीने १५ दिवसापुर्वी ठाणे येथे गळफास घेवून आत्महत्या केली होती.त्या नैराश्यापोटी कुणालने आत्महत्या केली असावी असा कयास धरण्यात येत असून कुणाल हा एकूलता एक वंश होता.

त्यानेही आत्महत्या केली त्यामुळे घराला वंशज राहीला नाही.त्याच्या पश्‍चात आई-वडील,आजी आजोबा व एक बहीण असा परिवार आहे.पो.पा.बन्सीलाल देवरे यांनी पो.स्टे.ला खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

LEAVE A REPLY

*