Type to search

जळगाव

सहकारी तत्त्वावर रुग्णालय सुरु करण्यास मंजूरी

Share

जळगाव| वि.प्र. – जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची पतपेढी ची ६६ वी वार्षीक सर्वसाधारण सभा लेवा बोर्डींगच्या सरस्वती हाल मध्ये दू.१ वा.पतपेढीचे अध्यक्ष शालीग्राम भिरुड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यासभेत विषय क्र.२१ वगळता सर्व विषयांना चर्चा करुन मंजूर करण्यात आले. या सभेत कार्यकारणीने केलेल्या वसतीगृह व इतर प्रयोजनासाठीची नवीन इमारत तसेच जूनी इमारत नुतनीकरण कामांचा सभासदांनी गौरव करुन अभिनंदनाचा ठराव पारित केला. या सभेत सभासद कल्याण निधीतून सहकारी तत्वावर सभासदांसाठी रुग्णालय सुरु करण्याच्या विषयाला मंजूरी देण्यात आली.

प्रथमतः विविध दिवगंत सभासद, देशातील शहीद सैनिक,पूरग्रस्तांना सभेत श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली. मानद सचिव मनोहर सुर्यवंशी यांनी विषय वाचन केले. सभासदांना लोकशाही पध्दतीने प्रश्न विचारण्याची मुभा देण्यात आल्याने त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना अध्यक्ष शालीग्राम भिरुड यांनी समर्पक उतरे देवून त्यांचे समाधान केले.सभेत १ ते २३ विषयावर चर्चा करण्यात आली.त्यात कर्जासाठी स्टँपपेपर घेणे हा विषय नामंजूर करण्यात आला.तसेच मानद सचिव व खजिनदार यांचे मानधन वाढविण्यास सभासदांनी नकार दिल्याने त्यांचे मानधन जैसे थे ठेवण्याचे निश्चित करण्यात आले.

या सभेला उपाध्यक्ष बी.टी.सपकाळे, खजिनदार एन.वाय.पाटील, संचालक शरदकुमार बन्सी, नंदकुमार पाटील, व्ही.टी.पाटील, गजानन गव्हारे, संचालिका अलका पाटील, शुभांगिनी महाजन,अजय देशमुख, पी.एस.पाटील,जगदिश पाटील, पी.डी.पाटील, आर.एल.बाविस्कर, हेमंत चौधरी, संजय निकम ,शैलेश राणे ,जयंत चौधरी, तज्ञ संचालक शेख हारुन,राजू चौधरी,कार्यलक्षी संचालक वा.जा.पाटील,राजेंद्र महाजन उपस्थित होते.सभेला बहुतांशी सभासदांची हजेरी होती. सभा शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.राष्ट्रगीतांनंतर सभा संपली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!