सलीम खान यांनी केलेल्या शौचालय हटवण्याच्या मागणीला प्रशासनाचा नकार

0

मुंबईतील वांद्रेयेथील अभिनेता सलमान खानच्या घरासमोरील सार्वजनिक शौचालय हटवण्यास प्रशासनाने नकार दिला आहे.

सलमान खानचे वडील आणि ज्येष्ठ लेखक सलीम खान यांनी आपल्या घरासमोरील सार्वजनिक टॉयलेट हटवण्यात यावे अशी मागणी केली होती. त्यांनी महापौरांना यासंबंधी पत्र लिहिले होते.

घरासमोरील सार्वजनिक टॉयलेटमुळे गैरसोय होत असल्याने ते हलवण्यात यावे, असे कारण सलीम खान यांनी महापौरांना दिले होते.

मात्र प्रशासनाने त्यांची ही मागणी फेटाळून लावत स्पष्ट नकार दिला आहे.

शौचालय स्वच्छ ठेवण्यासाठी काळजी घेतली जाईल, मात्र ते अन्यत्र हलवली जाणार नाही, असं उत्तर प्रशासनाकडून महापौरांना पाठवले जाणार आहे. 

LEAVE A REPLY

*