सलमान-सोनाक्षी ‘आयफा’साठी पुन्हा एकत्र येणार!

0

आयफा अवार्डचे आॅर्गनायझर्स (विजक्रॉफ्ट एंटरटेनमेंट) आयफावर एक चित्रपट बनवत आहेत.

यात सोनाक्षी सिन्हा व दिलजीत दोसांज मुख्य भूमिकेत असणार आहेत.

तर सलमान खान कॅमिओ करणार आहे. सलमानशिवाय करण जोहर, आदित्य राय कपूर आणि बोमन इरानी हेही यात कॅमिओ करताना दिसतील.

आयफाच्या ग्रीन कार्पेटवर बोलताना सलमानने या वृत्तास दुजोरा दिला.

मी आयफा अवार्डसाठी न्यूयॉर्कला आलो, तेव्हापासून यावर काम सुरू आहे. वासू भगनानी व आयफासाठी मी एक कॅमिओ शूट केला. हा चित्रपट आयफावर आधारित आहे.

आता तो कसा असेल, हे आपण बघू, असे सलमान म्हणाला. सोनाक्षीनेही या वृत्ताला दुजोरा दिला.

LEAVE A REPLY

*