सलमान जोधपुर न्यायालयात हजर राहणार

0

सलमान खानला काळवीट शिकार प्रकरणात बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी शुक्रवारी जोधपुर जिल्हा न्यायालयात हजर राहावे लागणार आहे.

वैयक्तिक जातमुचलक्याच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यासाठी त्याला न्यायालयात जावे लागणार असून, त्याला २० हजार रुपये जमा करावे लागणार आहेत.

जानेवारीमध्ये त्याची या प्रकरणात निर्दोष मुक्तता केल्यानंतर राज्य सरकारने मार्चमध्ये जिल्हा सत्र न्यायालयाकडे पुन्हा अपील केले होते. ज्यासाठी सलमानला आज न्यायालयात हजर राहावे लागेल. याशिवाय सलमान खानला २० हजार रुपयांचा जातमुचलका भरावा लागणार आहे. गेल्यावेळी सलमानच्या पोलीस संरक्षणचा मुद्दा पुढे करत त्याच्या वकिलाने तो हजर राहू शकत नसल्याचे सांगितले होते.

‘हम साथ साथ है’ सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान कंकणीजवळ सलमानने चिंकारा आणि काळवीटची शिकार करताना अमेरिकन बनावटीची रिव्हॉल्वर आणि बंदुकीचा वापर केल्याचा आरोप त्याच्यावर त्याच्यावर होता. पण सलमान विरोधात कोणताही सबळ पुरावा नसल्यामुळे त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.

 

LEAVE A REPLY

*