सलमान करणार सैफच्या मुलीला लाँच

0
मागील अनेक महिन्यांपासून सैफ अली खानची मुलगी सारा अली खानच्या बॉलिवूड पदार्पणाबाबत ब-याच चर्चा रंगल्या होत्या.
एका इंग्रजी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार अभिनेता सलमान खान त्याचा मेहुणा आयुष शर्मा आणि साराला एकत्र लाँच करणार आहे.
या नव्या प्रोजेक्टबद्दल सलमान लवकरच साराशी चर्चा करणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार साराने चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकली असून, ही एक प्रेमकथा आहे.
आयुष आणि साराची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचे चित्रीकरण नोव्हेंबर महिन्यात सुरु होईल अशीही ही चर्चा इंडस्ट्रीमध्ये रंगली आहे.
चित्रपटाचे नाव, दिग्दर्शक यासंबंधी अद्याप काहीही ठरलेले नाही

LEAVE A REPLY

*