सलमानच करणार ‘बिग बॉस 11’ला होस्ट!; अक्षयकुमारने केला खुलासा

0

गेल्या काही दिवसांपासून सलमानची जागा अक्षयकुमार घेणार असल्याच्या चर्चेला अक्षयकुमारनेच पूर्णविराम दिला आहे.

अक्षयने याबाबतचा खुलासा करताना म्हटले की, ‘बिग बॉस’चा सीजन-११ सलमान खानच होस्ट करणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अक्षयकुमार बिग बॉसचा ११ वा सीजन होस्ट करणार असल्याची चर्चा घडवून आणली जात होती. मात्र अक्षयनेच या चर्चा निरर्थक ठरविल्या आहेत.

एका मुलाखतीत अक्षयने स्पष्ट केले की, ‘बिग बॉस’-११च्या शो मेकर्सनी त्याच्याशी कुठल्याही प्रकारचा संपर्क साधला नाही. सलमान गेल्या सात वर्षांपासून हा शो होस्ट करीत आहे.

त्यामुळे मी त्याची जागा घेऊ शकत नाही. अक्षयने याबाबतचा खुलासा त्याच्या आगामी ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान केला.

LEAVE A REPLY

*