सर्व शाळांमध्ये तक्रार पेटी बंधनकारक

0

मुख्याध्यपक, पोलिस, पालक व विद्यार्थी प्रतिनिधी समक्ष उघडण्यात येणार

 

अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये यापुढे तक्रार पेटी बसविणे बंधनकारक असून त्या अनुषंगाने शाळा व्यवस्थापनाने करावयाची कार्यवाही तसेच क्षेत्रिय यंत्रणांची जबाबदारी निश्‍चित करण्यात आली आहे. याबाबतचा अध्यादेश काल जारी करण्यात आला आहे.

 
सर्व शाळांमध्ये तक्रारपेटी शाळेच्या दर्शनी भागात अथवा प्रवेशद्वाराच्या नजीक लावण्याची कार्यवाही करण्यात यावी. तक्रारपेटी पुरेशी मापाची व सुरक्षित असावी असे निर्देश देण्यात आले आहेत.

 
तक्रारपेटी प्रत्येक आठवड्याच्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशी उघडण्यात यावी.तक्रारपेटी सबंधित शाळेचे मुख्याध्यापक, प्राचार्य, पोलीस प्रतिनिधी,पोलीस पाटील, पालक प्रतिनिधी, विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या समक्ष उघडण्यात येणार आहे.

 
गंभीर/संवेदनशील स्वरूपाच्या तक्रारींबाबत पोलिस यंत्रणांचे सहाय्य आवश्यक असल्यास तात्काळ घेण्यात येणार आहे. सर्व तक्रारींची नोंद घेईन तक्रार निवारण करण्यासाठी योग्य कार्यवाही करण्यात यावी, असे सूचविण्यात आले आहे. विशेष म्हणजे तक्रारकर्त्यांचे नाव गुप्त राहील आणि तक्रारीच्या अनुषंगाने त्यांना कोणताही त्यास होणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे.

 
झेडपी शाळांमध्ये याबाबतची कार्यवाहीची जबाबदारी शिक्षणाधिकार्‍यांवर सोपविण्यात आली आहे. याबाबतची एकत्रित माहिती शिक्षण उपसंचालकांना देणे अनिवार्य आहे.

 
आलेल्या तक्रारींवर कार्यवाही करून निवारण करण्याचे कर्तव्यही पार पाडावे लागणार आहे.

 

 

LEAVE A REPLY

*