Type to search

सर्वोच्च न्यायालयाने श्रीसंतवरची बंदी उठवली

क्रीडा

सर्वोच्च न्यायालयाने श्रीसंतवरची बंदी उठवली

Share
नवी दिल्ली । आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी आरोपी असलेल्या श्रीसंतला सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यालयाने श्रीसंतवरील आयपीएलमधली बंदी उठवली आहे. त्यामुळे आता आयपीएलमध्ये खेळण्यासाठी श्रीसंतची वाट मोकळी झाली आहे. ममला शिक्षा देण्याचा अधिकार बीसीसीआयला नाही. असे वक्तव्य श्रीसंतने केले होते. हे असे म्हणणे योग्य नाही.फ असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. बीसीसीआयला कोणत्याही प्रकरणात खेळाडूंवर कारावाई करण्याचा हक्क असतो. परंतू या तुलनेत श्रीसंतला अधिक कठोर शिक्षा दिली गेली. बीसीसीआयने ठोठावलेल्या या शिक्षेवर परत एकदा पुर्नविचार करावा आणि यावर 3 महिन्यात निर्णय घ्यावा. असे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहे.

2013 मध्ये आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणात श्रीसंतचे नाव समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी केल्यानंतर श्रीसंतला क्लीन चिट मिळाली होती. परंतु, बीसीसीआयने त्याच्यावर या प्रकरणी आजीवन बंदी घातली होती. त्यानंतर केरळ उच्च न्यायालयाच्या एका खंडपीठाने त्याच्यावरील बंदी हटविली होती. मात्र, बीसीसीआयने दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवर सुनावणी करताना केरळ उच्च न्यायालयाने आपला पहिला निकाल बदलून पुन्हा त्याच्यावर बंदी घातली होती.

दिल्ली न्यायालयाने श्रीसंतची सुटका केली होती. परंतू केरळ उच्च न्यायालयाने दिल्ली न्यायालयाने दिलेल्या निर्णय बदलून बीसीसीआयने दिलेल्या बंदीचा निर्णय कायम ठेवला. बीसीसीआयने आयपीएल 2013 मध्ये स्पॉट फिक्सिंगमध्ये संशयित असल्याने त्यावर आजीवन कारवाई करण्यात आली होती. बीसीसीआयच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याआधी बीसीसीआयने आपल्या बाजूने न्यायालयात श्रीसंतवर भ—ष्टाचार, फिक्सिंग आणि खेळाचा अपमान केल्याचा ठपका ठेवला होता.

सर्वोच्च न्यायालयात बीसीसीआयची बाजू मांडणारे वकील पराग त्रिपाठी यांनी म्हटलं की, मखेळामध्ये भ—ष्टाचार करणे आणि सट्टाबाजी करणार्‍यांवर आजीवन बंदी टाकण्यात येते.फ बीसीसीआयच्या झिरो टॉलरेंसचा संदर्भ देत त्यांनी ही गोष्टी न्यायालयासमोर ठेवली. मश्रीसंतने कधीच बीसीसीआयच्या भ—ष्टाचार विरोधी पथकाला या गोष्टीची माहिती दिली नाही की त्याला कोणत्याही सट्टेबाजाने संपर्क केला आहे.फ बीसीसीआय न्यायालयात म्हटलं होतं की, मश्रीसंतला मिळालेल्या 10 लाखांबद्दलचा स्त्रोत काय याबद्दल त्याने शोध समितीकडे अजूनही खुलासा केलेला नाही.

या प्रकरणावर श्रीसंतची बाजू मांडणारे वकील सलमान खुर्शीद म्हणाले होते की, बीसीसीआयने श्रीसंतवर 10 लाख रुपये घेतल्याचा आरोप केला आहे. ते पैसै फिक्सिंगसाठीच घेतले होते हे त्यांनी सिद्ध करावे. फोनवर झालेल्या संभाषणा बद्दल बोलताना ते म्हणाले की, जेव्हा एक ओव्हरमध्ये 14 पेक्षा कमी रन दिल्या असत्या तेव्हा, फिक्सिंग केल्याचा आरोप खरा ठरला असता.‘श्रीसंत आता युवा खेळाडू नसला तरी त्याच्यात क्रिकेट खेळण्याचा उत्साह कमी झालेला नाही. त्याच्या क्रिकेट करियरला व्यर्थ होण्यापासून वाचवायला हवे.’ हा मु्द्दा सलमान खुर्शीद यांनी शेवटी व्यक्त केला. याआधी पहिल्या सुनावणीत श्रीसंतने म्हटलं होतं की, पोलिसांच्या दबावात त्याने गुन्हा कबूल केला होता.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!