‘सर्वशिक्षा’चे 238 कोटींचे अंदाजपत्रक

0

नाशिक : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने राबवण्यात येणार्‍या सर्वशिक्षा अभियान या योजनेच्या सुमारे 25 उपयोजनांसाठी 238 कोटी 19 लाख 59 हजार रुपयांचे प्रस्तावित अंदाजपत्रक येत्या आर्थिक वर्षासाठी तयार करण्यात आले आहे.

निवासी वसतीगृह, प्रवास सुविधर, आरटीई 25 टक्के प्रवेश प्रतिपुर्ती, मुलांना विशेष शिक्षण, हंगामी वसतीगृह उभारणे, मोफत पाठ्यपुस्तक योजना, मोफत गणवेश योजना, नियमित शिक्षक वेतन, शिक्षक प्रशिक्षण, गटसाधन केंद. अनुदान, समूह साधन केंद्र अनुदान, संगणक शिक्षण, ग्रंथालय, शिक्षक अनुदान, शाळा अनुदान, संशोधन मुल्यमापन, पर्यवेक्षण, देखभाल दुरुस्ती अपंगांना शिक्षण, नवीन उपक्रम,शाळा व्यवस्थापन समिती, नागरी बांधकामे, व्यवस्थापन खर्च, अध्ययन समृद्धी, लागकजागृती आणि कस्तुरबा गांधी बालिा विद्यालय आदी उपक्रमासाठी शिक्षण विभागाकडे 238 कोटी 19 लाख रुपये खर्चाचे प्रस्तावित अंदाजपत्रक तयार करण्यात आल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रविण आहिरे यांनी सांगितले.मुख्य कार्यकारी अधिकारी हे अंदाजपत्रक सादर करतील, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणाले.

LEAVE A REPLY

*