सर्पदंश झाल्याचे वेळीच लक्षात न आल्याने खतवडच्या बालिकेचा मृत्यू

0

दिंडोरी l वार्ताहर, ता. ३ : तालुक्यातील खतवड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता पाचवीत शिकणारी कु. तनुजा राजेंद्र कतोरे (खुर्दळ)(वय-10)हिचा सर्पदंशाने मुर्त्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

खतवड येथील राजेंद्र कतोरे (खुर्दळ ) यांची मुलगी कु. तनुजा हि आज सकाळच्या सुमारास लघूशंकेसाठी घराबाहेर आली.

तिच्या पायाला काही तरी किडा चावल्याचे जाणवले. परंतु प्रत्यक्षात सर्पदंश झाला असल्याचे निर्देशनास आले नाही.

तळेगाव-दिंडोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करून प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले.

माञ घरी आल्यावर तिची तब्येत आणखीणच खालावल्याने नाशिक जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ नेले असता, डॉक्टारांनी तिला घोषित केले.

जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करून शोकाकूल वातावरणात खतवड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या पश्चात आई वडील, आजी, भाऊ, दोन चुलते -काकू,असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

*