सर्जेपुरातील बेंद्रे हॉस्पिटलवर जेसीबीचा घाव

0

डॉक्टरांची जिल्हाधिकार्‍यांकडे धावः बैठक अनिर्णीत

अहमदनगर (प्रतिनिधी) – महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने आज चौथ्या दिवशी सर्जेपुरा परिसरातील बेंद्र हॉस्पिटल मधील अनाधिकृत बांधकाम अतिक्रमण विभागाने हातोडा उगारला. दरम्यान सकाळी 11.30 च्या सुमारास शहरातील सर्व डॉक्टर यांनी पुन्हा जिल्हाधिकारी अभय महाजन यांच्या कडे धाव घेऊन सुरु असलेली कारवाई थांबवावी अशी मागणी केली. त्यानंतर तातडीने अतिक्रमण प्रतिबंधक विभागचे प्रमुख सुरेश इथापे हे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले. तेथे डॉक्टरांसोबत जिल्हाधिकार्‍यांची बैठक झाली. बैठकीत कोणताच निर्णय न झाल्याने कारवाई सुरूच राहिल असे महापालिकेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.
शहरातील हॉस्पिटलच्या नियमबाह्य इमारतीवर शनिवार महापालिकेने कारवाई सुरु केली आहे. नियमबाह्य हॉस्पिटलचा प्रश्‍न थेट खंडपीठात पोहचला असून त्यावर उद्या सुनावणी होणार आहे. त्यापूर्वी खंडपीठाने महापालिकेकडे अ‍ॅक्शन टेकन रिपोर्ट मागविला असल्याने ही कारवाई सुरू आहे. अतिक्रमण प्रतिबंधक विभागाने करवाई थांबवावी अशी मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे उपस्थित डॉक्टरांनी केली.

आज सर्जेपुरा येथील बेंद्र हॉस्पिटलमध्ये अतिक्रमण पाडण्याची करवाई सुरू असताना डॉक्टरांनी जिल्हाधिकार्‍यांकडे धाव घेतली. तेथील बैठकीसाठी बोलविण्यात आल्याने कारवाई थांबविण्यात आली. बैठकीत कोणताच निर्णय झाला नाही. यामुळे ही कारवाई यापुढेही सुरू राहिल.
– सुरेश इथापे, अतिक्रमण प्रतिबंधक विभाग

LEAVE A REPLY

*