सरकारी कर्मचार्‍यांचा संपाचा इशारा

0
धुळे । दि.14 । प्रतिनिधी-राज्यातील सुमारे 19 लाख सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर समितीतर्फे कर्मचार्‍यांच्या प्रलंबीत मागण्या व शासनाने दुर्लक्ष केल्यामुुळे दि.12, 13 व 14 जुलै रोजी तीन दिवसाच्या संपाचा इशारा देण्यात आला आहे.
दि.16 जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन मागण्याची पूर्तता करण्याचे आश्वासन देवून देखील त्यावर कार्यवाही करण्यात आली नाही.
सरकारी कर्मचारी व त्यांच्या प्रलंबीत मागण्यांप्रती शासनाचे धोरण उदासिनतेचे आहे. यामुळे कर्मचार्‍यांमध्ये संतापाची लाट आहे.

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी राज्य कर्मचार्‍यांना लागू कराव्यात, नवीन पेन्शन योजना रद्द करुन कंत्राटी कर्मचार्‍यांना नियमीत सेवेत सामावून घेवून रिक्त पदे तात्काळ भरावीत, चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांच्या एका वारसास शासन सेवेत सामावून घ्यावे, पाच दिवसांचा आठवडा, निवृत्तीचे वय 60 वर्ष करावे यासह अन्य मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला आहे.

तीन दिवसाच्या संपानंतरही मागण्याची पूर्तता न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. दि.11 जून रोजी राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत सदरचा निर्णय घेण्यात आला असून धुळे जिल्ह्यातून सदर बैठकीस डॉ.संजय पाटील, रत्नाकर वाघ, ए.सी.चौधरी, शाम टिपरे, प्रदीप जगताप आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*