Type to search

धुळे

सरकारच्या चांगल्या कामामुळे विरोधकांकडे मुद्देच नाही

Share

दोंडाईचा | केंद्रातील नरेंद्र मोदी आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने एवढे चांगले काम केले आहे की विरोधकांकडे आता मुद्देच उरलेले नाहीत, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री ना.रावसाहेब दानवे पाटील यांनी केले.

आज शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातील शक्तीकेंद्रप्रमुख, ३३८ बुथ प्रमुख आणि ५ हजार पन्ना प्रमुखांचा मेळावा दोंडाईचा येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला ना.दानवे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना.जयकुमार रावल, खा.डॉ.सुभाष भामरे, बेटी बचाव योजनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.राजेंद्र फडके, संघटनमंत्री किशोर काळकर, शिंदखेडा मतदारसंघाचे प्रभारी लक्ष्मण साहुजी, नगराध्यक्षा सौ.नयनकुंवरताई रावल, रजनी वानखेडे, संजीवनी सिसोदे, जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, सभापती नारायण पाटील, कामराज निकम, तालुकाध्यक्ष नथा पाटील, दोंडाईचा शहराध्यक्ष प्रविण महाजन, शिंदखेडा शहराध्यक्ष दिनेश सुर्यवंशी, यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

हा मेळावा दोंडाईचा येथील दादासाहेब रावल क्रीडा सकुंलात आयोजित करण्यात आला होता. यात शक्तीकेंद्रप्रमुख, बुथ प्रमुख आणि पन्नाप्रमुख यांनी निवडणुकीत करावयाचे काम याबाबत माहिती देण्यात आली. या मेळाव्याला बेटी बचाव बेटी पढाव योजनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.राजेंद्र फडके, प्रदेश चिटणीस लक्ष्मण साहुजी, संघटनमंत्री किशोर काळकर, यांच्यासह जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, डॉ.सुभाष भामरे, ना.जयकुमार रावल यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी बोलतांना ना.दानवे म्हणाले की, भाजपा हा सर्वाधिक सदस्य संख्या असलेला पक्ष आहे. देशाप्रमाणेच राज्यात देखील भाजपाचे सर्वाधिक एक कोटी ५ लाख सदस्य आहेत, त्यामुळे बुथ प्रमुख पन्ना प्रमुख यांनी स्वत:ला भाग्यवान समजावे की, आपण जगातील सर्वात मोठया पक्षाचे बुथ प्रमुख किंवा पन्ना प्रमुख आहोत, पक्षाची बांधणी ही संघटनेतून झाली असून येथे गरीब माणूस असलेले नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले आहेत, देशसेवा हेच पक्षाचे पहिले ध्येय असल्यामुळेच काश्मिरमधून ३७० कलम हटविण्याची धमक मोदींनी दाखविली. केंद्रातील नरेंद्र मोदी आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने एवढे चांगले काम केले आहे की विरोधकांकडे आता मुद्देच उरलेले नाहीत, फक्त दलित आदिवासींना घटना बदलणार किंवा आरक्षण रदद करणार अशा वावडया उठवून ते राजकिय पोळी भाजत आहेत, त्यांच्या पक्षात आता उमेदवारी करायला देखील कुणी शिल्लक नसल्याचा टोला देखील ना.दानवे यांनी यावेळी लगवला.

ना.जयकुमार रावल म्हणाले की, राज्यात आणि देशात हक्काचे सरकार विराजमान झाल्यामुळे शिंदखेडा मतदारसंघातील प्रत्येक गावात कोटयावधीचा निधी पोहचवून कामे केली आहेत, सिंचन, शिक्षण आणि उद्योग या त्रिसुत्रीमध्ये हजारो कोंटीचा निधी आणून मतदारसंघात कामे केली आहेत, गेल्या १५ वर्षांपासुन जनतेला मला भरभरून प्रेम केले आहे, त्यामुळे यावेळी देखील असेच प्रेम ठेवावे त्यासाठी बुथ प्रमुख, पन्ना प्रमुख यांच्या भरवश्यामुळे मी ही निवडणुक लढविणार असून पक्षाने मला राज्याची देखील जबाबदारी दिली असल्याने मला प्रत्येकापर्यंत पोहचणे एवढया कमी कालावधीत जास्त वेळ देता येणार नाही, माझा प्रतिनिधी म्हणून शक्ती केंद्र प्रमुख, बुथ प्रमुख, पन्ना प्रमुख यांनी मी मतदारसंघात आणलेला निधी मतदारांना पटवून सांगावे असे आवाहन ना.जयकुमार रावल यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डी.एस.गिरासे यांनी केले तर आभार बाजार समितीचे सभापती नारायण पाटील यांनी व्यक्त केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!