सरकारचे शैक्षणिक धोरण चुकीचे

0

दादा कळमकर यांची टीका

अहमदनगर (प्रतिनिधी) – धोरणामुळे शिक्षण क्षेत्रात नवनवीन धोरणे राबवताना सध्याच्या सरकारने गोंधळाचे वातावरण तयार केले आहे. या चुकीच्या शैक्षणिक धोरणामुळे महाराष्ट्रात शैक्षणिक व गुणवत्तेच्या बाबतीत अग्रगण्य असलेल्या रयत शिक्षण संस्थेला देखील विविध समस्यांना समोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत शैक्षणिक प्रश्‍नांवर लढणार्‍या संघटनांना आमचा पाठींबा असल्याचे आश्‍वासन माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांनी दिले.
रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागयी सल्लगार समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा अहमदनगर महानगर शिक्षक संघातर्फे सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महानगर संघाचे अध्यक्ष उध्दव गुंड, सचिव शंकर बारस्कार, कोषाध्यक्ष राजेंद्र लांडे, महोदेव भद्रे, विष्णू मगर, सुभाष पानसंबळ, आर.एस.बनकर, रमेश जाधव, गणेश उघडे, संजय निक्रड, योगेश मोरे, उन्मेश शिंदे, नितीन म्हस्के उपस्थित होते.
गुंड म्हणाले, सरकारने नोकर भरती बंद केली असल्याने शाळांमध्ये शिक्षक संख्या कमी आहे. त्यातच विषयानुसार काही शाळांनी तासिकांची संख्यादेखील कमी केली आहे. त्यामुळे अनेक शिक्षक संस्था घटनार आहे. सध्याच्या विद्यार्थी संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरणार्‍या शिक्षकांचा प्रश्‍ना संबधी अनेक माध्यमिक शिक्षकांमध्ये कमालीची अस्वस्था पसरली आहे. त्यांच्याकडून विद्यार्थी कसे घडणार असे मत त्यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

*