सरकारकडून विरोधकांची मुस्कटदाबी

कॉंगे्रस प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांचा आरोप

0
नाशिक | दि. ११ प्रतिनिधी-  आघाडी सरकारच्या काळात विरोधकांचे म्हणणे ऐकून घेत, सरकार त्याचा उपयोग कारभार करताना लक्षात घेत असे. आता युती सरकार विरोधकांनी काही मुद्दे मांडले की, ते खोडून काढत, उलट विरोधकांच्या उणीवांवर बोट ठेवते.मुख्यमंत्री सभागृहात त्वेषाने बोलून विरोधकांची मुस्काटदाबी करीत आहे, असे प्रतिपादन कॉंगे्रस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले.

शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत चव्हाण माध्यम प्रतिनिधींसी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी शेतकरी आत्महत्या, भाजप प्रदेशाध्यक्ष दानवे यांचे वादग्रस्त वक्तव्य आणि शासनाच्या कामकाज पद्धतीवर टिका केली. ते म्हणाले की, रावसाहेब दानवे यांनी शेतकर्‍यांबाबत केलेले व्यक्तव्य म्हणजे भाजप पक्षाची भूमिका आहे का, याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा.

तुर उत्पादक शेतकर्‍यांच्या भावना तीव्र असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष वादग्रस्त बोलतातच कसे, असे म्हणून चव्हाण यांनी भाजप शेतकर्‍यांप्रती कोणती मानसिकता ठेवते, याचा प्रत्यय आल्याचा दाखला दिला.
सत्तेत असूनही शिवसेनेला अस्तित्वाची लढाई करावी लागत असल्याचे, चव्हाण यांनी यावेळी शिवसेना पक्षप्रमुखांना चिमटा काढताना म्हटले. नगरपालिका, मनपा आणि जिल्हा परिषदांमध्ये शिवसेनेला जे संमिश्र यश मिळाले आहे. त्यावरून या पक्षात राजकीय अस्तित्वाच्या असुरक्षितेचा मुद्दा निर्माण झाल्याचे दिसत आहे. उलट कॉंगे्रस पक्षाने संघर्ष यात्रा काढून सर्व पक्षांना सोबत घेऊन सक्षम विरोधकाचे स्वरुप शासनाला दाखवून दिलेले आहे.
विरोधक जेव्हा सभागृहात बोलतात. त्यावेळी भाजप नेमके त्यातील काही आमदारांच्या चुका त्यांच्या लक्षात आणून देत आणि भिती दाखवत त्यांना आपल्या बाजूला करीत त्यांचा आवाज बंद करतात. निवडणूकीत अनेक गुन्हेगारांना उमेदवारी देत भाजपने वाल्याचा वाल्मिकी केल्याचे नितीन गडकरी मोठ्या अभिमानाने कसे सांगू शकतात, असे चव्हाण यांनी भाजपवर टीका करताना म्हटले. शासनाने निवडणूकीत पैसा आणि यंत्रणेचा पुरेपुर वापर करून घेतल्याचा आरोप

LEAVE A REPLY

*