सयाजी शिंदे आता दिसणार शेतकऱ्याच्या भूमिकेत!

0

खलनायक साकारलेले अभिनेता सयाजी शिंदे आता शेतकऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहेत.

त्यांची प्रमुख भूमिका असलेला ‘धोंडी’ हा चित्रपट ९ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

या चित्रपटातून आपली खलनायकी इमेज मोडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.

आपल्या वडिलांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी दहा वर्षांचा एक मुलगा काय काय करामती करतो, याची वेधक कथा ‘धोंडी’ या चित्रपटात पहायला मिळणार आहे.

निरागस बाल मन, नातेसंबंध, बदलती नैसर्गिक परिस्थिती, शेतकऱ्यांच्या समस्या अशा मुद्द्यांवर हा चित्रपट भाष्य करतो.

LEAVE A REPLY

*