समृध्दी महामार्गाच्या भूसंपादनास शेतकर्‍यांचा विरोध

0

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेः पाटबंधारे विभाग विश्राम गृहावर बैठक
राहाता (वार्ताहर)- कोपरगाव तालुक्यातून जाणार्‍या समृध्दी महामार्गाच्या भुसंपदनास शंभर टक्के शेतकर्‍यांचा विरोध असून हे सरकार या शेतकर्‍यांना उद्ध्वस्त करून कोणती समृध्दी आणू पाहत आहे. असा सवाल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.
राहाता येथील पाटबंधारे विभाग विश्राम गृहावर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी गणेशचे अध्यक्ष मुकूंदराव सदाफळ, माजी पं.स. सदस्य दीपक रोहम, रावसाहेब देशमुख, नगरसेवक विजय सदाफळ, बाळासाहेब जपे, विखे कारखाना एम.डी. भागडे, जालींदर तुरकणे, संजय सदाफळ, अ‍ॅड. रघुनाथ बोठे, अ‍ॅड. चांगदेव धनवटे व पाटबंधारे उपकार्यकारी अभियंता गुटूंमवार आदी उपस्थित होते.
यावेळी विखे पाटील म्हणाले, मुठभर लोकांच्या समृध्दीसाठी हे सरकार कोपरगाव व सिन्नर भागातील हजारो शेतकर्‍यांना उद्ध्वस्त करू पाहात आहे. बागायती जमीनीचे भुसंपादन करण्यास या भागातील शंभर टक्के शेतकर्‍यांचा याला विरोध आहे. याचे भान लोकप्रतिनिधींनी ठेऊन शेतकर्‍यांच्या भावना जाणून घ्याव्यात. शेतकरी संपावर जाण्यापूर्वीच यावर तोडगा काढावा.

शेतकर्‍यांशी चर्चा करून यातून मार्ग काढण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. संघर्ष यात्रेचा चौथा व शेवटचा टप्पा उद्या रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन सुरू केला जाणार आहे. शेवटची सभा जेष्ठ नेते नारायण राणे यांच्या उपस्थितीत बांदा येथे होणार आहे. या दौर्‍याचे नियोजन राणे हेच करत असल्याची माहीती विखे पाटील यांनी यावेळी दिली.

संघर्ष यात्रेची धास्ती सरकारने घेतल्यानेच त्यांनी संवाद यात्रा सुरू केली असल्याची टीका यावेळी केली. पाटपाण्याचे योग्य नियोजन करून उभ्या पिकांना पाणी देण्याच्या अधिकार्‍यांना ना. विखे यांनी सुचना दिल्या. गोदावरी कालव्याचे शेवटचे उन्हाळी आवर्तनाचे योग्य व काटकसरीने नियोजन करावे. कोणताही व्यत्यय येणार नाही याची काळजी घ्यावी, उभ्या पिकांना पाणी द्यावे अशा सुचना त्यांनी यावेळी दिल्या.

LEAVE A REPLY

*