‘समृध्दी’विरोधात शेतकर्‍यांसह सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांचा मोर्चा

0

घोटी : इगतपुरी तालुक्यातुन जाणारा प्रस्तावित मुंबई नागपुर समृध्दी महामार्गास जमीनी संपादीत करण्यासाठी शेतकर्‍यांचा तीव्र विरोध असुन शासनाच्या विरोधात नाशिक जिल्हा समृध्दी महामार्ग शेतकरी संघर्ष समिती, शेतकरी व सर्वपक्षीय पदाधिकारी यांनी मुंबई महामार्गावरील बोरटेंभे गावापासुन ते तहसील कार्यालयापर्यंत भर उन्हात जोरदार घोषणाबाजी करीत मोर्चा काढुन प्रांत आधिकारी राहुल पाटील, तहसीलदार अनिल पुरे यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, शासनाने प्रस्तावित केलेल्या मुंबई नागपुर समृध्दी महामार्ग व कृषी विकास केंद्र तालुक्यातील तळेगाव ते पिंपळगाव डुकरा या दरम्यान असलेल्या एकुण 22 जाणार आहे. परिणामी तालुक्यातील शेतकरी पुर्णतः देशोधडीला लागणार आहे.तालुक्यातील एकुण 82812 हेक्टर पैकी यापुर्वीच वन क्षेत्राकरीता 21846 हेक्टर, धरणांसाठी 12753 हेक्टर, लष्कराकरीता 12000 हेक्टर, राष्ट्रीय महामार्गसाठी 3150 हेक्टर, रेल्वेसाठी 300 हेक्टर, पेट्रोल पाईप लाईनसाठी 145 हेक्टर, औद्योगीक क्षेत्रासाठी 1250 हेक्टऱ, अन्य छोटे रस्ते, छोटी गावे, लहान मोठे तलाव यासाठी हेक्टर जमीन शासनाने संपादित केली आहे. आता प्रस्तावित समृध्दी महामार्गासाठी 450 हेक्टर व कृषी विकास केंद्रासाठी 1400 हेक्टर जमीनी दिल्यास एकुण 56744 हेक्टर जमीन होते. यामुळे शिल्लक फक्त 26068 हेक्टर इतकेच क्षेत्र शिल्लक राहणार असल्याने शेतकर्‍यांवर अन्याय होणार आहे.

प्रस्तावित महामार्ग व कृषी विकास केंद्रे रद्द व्हावे अशी एकमुखाने भुमिका तालुक्यातील 22 गावांतील बाधित शेतकर्‍यांनी घेतली आहे. त्यामुळे सध्या शासनाने सुरु केलेले सदर प्रकल्पाच्या मोजणीचे व भुसंपदना संबंधीचे सर्व कामे तात्काळ थांबवण्यात यावे. शासनाने जबरदस्तीने शेत-जमिनी संपादित करण्याचा प्रयत्न केल्यास तालुक्यातील 22 गावांतील हजारो शेतकरी सामुदायिक आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही. या परिणामास सर्वस्वी शासन जबाबदार राहील.यावेळी कार्याध्यक्ष राजू जि.प.सदस्य कावजी ठाकरे, उपसभापती भगवान आडोळे, ज्येष्ठनेते निवृती जाधव, भास्कर गुंजाळ, सोमनाथ वाघ, अ‍ॅड.दामोदर पागेरे, गोरख बोडके, मनसेना जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रतनकुमार इचम,माजी जि. प. सदस्य गोरख बोडके, माजी उपसभापती पांडूरंग वारूंगसे, पंचायत समिती सदस्य विठ्ठल लंगडे, कचरु डुकरे,अँड.दामोदर पागेरे, भास्कर शिंदे, मछिंद्र भगत, भागवत गुंजाळ, संदिप गुंजाळ, नानाजी भोसले, पागेरे, नामदेव राक्षे, भिकन भटाटे, महादेव आडोळे, शशिकांत आव्हाड, सुर्यकांत भागडे, नंदलाल भागडे, भागाजी उघडे, दौलत बोंडे, विष्णू शिंदे, रामदास बांडे, मनोहर आडोळे,संपत डावखर, हरिष भागडे, जगन गिते, रामचंद्र गव्हाणे, सोमनाथ दुभाषे, शहाजी पवार, रवि काळे, बंडू सुरुडे यांच्यासह शेकडो शेतकरी वर्ग सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

*