समृद्धी महामार्ग प्रकरणी लवकरच तोडगा काढू – आयुक्त महेश झगडे

0
नाशिक : जिल्ह्यातील बहुचर्चित समृद्धी महमार्गाचा प्रश्न मार्गी लावू, सर्व विभागात समन्वय साधून काम करणार असल्याचे नवनियुक्त विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी आज सांगितले.

नाशिक विभागीय आयुक्तपदाचा पदभार आज झगडे यांनी स्वीकारला त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, सर्व विभागात समन्वय साधून चांगल्याप्रकारे काम करू तसेच विभागातील शेतकरी आत्महतेयवर विशेष लक्ष ठेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील राहू जिल्ह्यातील बहुचर्चित  समृद्धी प्रश्न लवकरच तोडगा काढून मार्गी लावू असेही ते म्हणाले.

गोदा प्रदूषण मुक्तीसाठी प्रयत्न करणार आहोत. नाशिक प्राधिकरण रचनेत योगदान देणार असल्याचे झगडे यांनी यावेळी सांगितले.

समृद्धी प्रश्न तोडगा काढून मार्गी लावणार असल्याचे झगडे यांनी आज सांगितले त्यामुळे आता समृद्धी महामार्गावर काय तोडगा निघणार याकडेच जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

LEAVE A REPLY

*