समांतर रस्त्यासाठी 444 कोटींचा डीपीआर

0
जळगाव । दि.13। प्रतिनिधी-शहरातील समांतर रस्त्यांचा गेल्या काही वर्षांपासुन प्रश्न प्रलंबीत आहे. समांतर रस्त्यांअभावी महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
त्यामूळे समांतर रस्त्यांच्या मागणीसाठी जळगाव फर्स्ट आणि समांतर रस्ते कृती समितीच्या माध्यमातुन पाठपुरावा सुरु होता. दरम्यान समांतर रस्त्यासाठी 444 कोटींचा डीपीआर तयार करुन प्रकल्प संचालक अरविंद काळे यांनी नागपूर येथील नही च्या विभागीय कार्यालयाकडे सादर केला आहे.
नहीचे प्रकल्प संचालक अरविंद काळे आणि श्री.गंडी यांनी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांची आज भेट घेतली. यावेळी जळगाव फर्स्टचे डॉ. राधेश्याम चौधरी यांना देखील बोलविण्यात आले होते.

दरम्यान समांतर रस्त्यांसाठी 444 कोटीचा डीपीआर तयार करुन सादर केल्याची माहिती देण्यात आली. समांतर रस्त्यासाठी एल.एन. मालवीय सुपर व्हिजन कन्सल्टन्सी यांनी डीपीआर तयार करुन दिला आहे.

15.408 किमी चा हा जळगाव शहरातून जाणारा पाळधी बायपास पर्यंतचा हा रोड विकसित केला जाणार आहे.

15 कि.मी.चे भुयारी मार्ग
समांतर रस्त्यांसाठी 444 कोटी रुपयांचा डीपीआर तयार करण्यात आला आहे. यामध्ये महामार्गाच्या दुतफार्र् रस्त्यांचा विकास ,उड्डाणपूल ,पादचारी भुयारी मार्ग ,रेल्वे उड्डाण पूल ,वाहनांसाठी 8 ते 10 क्रॉसींग व 15 कि.मी.चे भुयारी मार्ग प्रस्तावीत करण्यात आले आहेत. दरम्यान हा डीपीआर दि.6 जून रोजी विभागीय कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. समांतर रस्त्यांसाठी पाठपुरावा केल्यामुळेच तातडीने डीपीआर तयार केला असल्याची माहिती डॉ. राधेश्याम चौधरी यांनी दिली.

LEAVE A REPLY

*