समर्पण सेवा संस्थानच्यावतीने सावली प्रकल्पातील विद्यार्थ्यांसमवेत रक्षबंधन

0

वंचितांना आनंद देण्यातच खरे समाधान : रुपा पंजाबी

अहमदनगर (प्रतिनिधी) – जग जेवढे आधुनिक होत चालले आहे. तेवढी गरीब-श्रीमंतामधील दरी वाढत चालली आहे. समाजामध्ये वंचित उपेक्षित असलेल्या घटक ांना प्रवाहात सामावून घेेण्याचे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. वंचितांना आनंद देणे यातच खरे समाधान असते. या उद्देशानेच नगरमध्ये समर्पण सेवा संस्थेची स्थापना केली आहे. गेल्या वर्षभरापासून शहरामध्ये विविध सामाजिक उपक्रम व वंचित उपेक्षितांना सहकार्य केले आहे. रक्षा बंधन हा आपआपसातील प्रेम वाढविणारा सण आहे. सावली प्रकल्पातील विद्यार्थ्यांसमवेत हा सण साजरा करुन त्यांना भेट वस्तू व खाऊ तसेच विविध उपयोगी वस्तू दिल्या आहेत, असे प्रतिपादन समर्पण संस्थेच्या अध्यक्षा रुपा पंजाबी यांनी केले.
सावली प्रकल्पातील सर्व विद्यार्थ्यांसमवेत शहरातील महिलांकरीता कार्य करणार्या समर्पण संस्थेच्यावतीने रक्षा बंधन सण उत्साहात साजरे करण्यात आले. यानिमित्त प्रकल्पातील मुलींनी मुलांना राखी बांधली. यावेळी सर्व मुलांनी आपलआपल्या बहिणीला विविध भेटवस्तूंची ओवाळणी दिली. याप्रसंगी उपाध्यक्ष शशी आनंद व संगीता जग्गी, खजिनदार, वर्षा तलवार, सेक्रेटरी सुनिता सहानी व हेमा बस्सी, सल्लागार मिन्नू चढ्ढा, सदस्या जागृती ओबेरॉय, शोभा खन्ना, गिता जग्गी आदिंसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या प्रास्तविकात संगीत जग्गी यांनी सांगितले, सावली प्रकल्प आज वंचितांसाठी फार मोठे काम करत आहे. या प्रकल्पातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे यासाठी रक्षाबंधनचा सण येथे समर्पण संस्थेने साजरा केला आहे. यापुढील काळातही बरेच मोठे उपक्रम हाती घेणार आहोत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशी आनंद यांनी केले तर आभार सुनिता सहानी यांनी मानले. कार्यक्रमास सुमन सहानी, राधा सहानी, रितू अरोरा, आशा दुग्गल, दीपा दुग्गल, आशा थापर, रिना कुमार, मिना मदान, प्रिती चोपडा, अंजुम मल्होत्रा, निती दिवाण, किरण नय्यर आदी उपस्थित होते. 

LEAVE A REPLY

*