सभागृहात उलगडणार हुकूमी पत्ते ; जिल्हा परिषद अध्यक्ष निवड उत्सुकता शिगेला

0

नाशिक : जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोणत्या पक्षाचा होणार, याची उत्सुकता शिगेला पोहाचली आहे. शिवसेना, काँगे्रस, माकप कि राष्ट्रवादी-भाजप हे नवी समीकरण, अशी चर्चा जिल्ह्यात असताना दावेदार पक्ष मात्र, गत दोन दिवसात जुळवलेल्या जि.प.अध्यक्ष निवडीचे राजकीय हुकूमी पत्ते आता सभागृहात उलगडून धक्का देण्याच्या तयारीत आहे.

शिवसेनेसह काँगे्रस, माकप राजकीय सहलीत गर्क आहेत. तर, भाजप राष्ट्रवादीचे सुत जुळवण्याच्या तयारीची धग कायम आहे. असे असताना अध्यक्ष निवडीचा कालावधी अवघा एक दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. त्यामूळे सत्ता कोण स्थापन करतो आणि अध्यक्ष कोणत्या पक्षाचा निवडला जातो, याची खंमग चर्चा जिल्ह्यात रंगू लागली आहे.
जिल्हा परिषदेत सर्वाधिक नवनिर्वाचित सदस्य शिवसेनेचे आहे, त्या खालोखाल राष्ट्रवादी, तिसर्‍या क्रमांकावर भाजप आणि चौथ्या स्थानी काँगे्रस आहे. शिवसेनेने सर्वाधिक पंचायत समित्यांवर झेंडा फडकवत स्पर्धेत सर्वात पुढे असण्याचा मान मिळवलेला आहे. मात्र राष्ट्रवादी काँगे्रसला अध्यक्षपदाच्या इच्छेचे धुमारे फुटल्याने भाजपसह इतर पक्षांना बरोबर घेण्याचा सवत्ता सुभा या पक्षाने खेळून पाहिलेला आहे. काँगे्रसने राष्ट्रवादीची ही खेळी हाणून पाडण्यासाठी वेगळाच राजकीय डाव हाणून पाडलेला आहे. त्यामूळे उद्या होणारी अध्यक्ष निवड ही सर्वच राजकीय पक्षांच्या दृष्टीने अतिमहत्वाच विषय झालेला आहे.

जिल्हा परिषदेत सहा दिवसांपूर्वी विद्यमाना सदस्यांची अंतिम सर्वसाधारण सभा झाली. त्यावेळी उपस्थित काही नव्याने निवडून आलेल्या सदस्यांना शुुभेच्छा देण्यात आलेल्या होत्या. मात्र त्यांची कार्यकीर्द नव्याने निवडून आल्यामुळे पुन्हा कायम राहणार असल्याने त्यांच्या अनुभवाचा उपयोग सदस्यांना व्हावा,असे नमूद करण्यात आलेले होते. तसेच विद्यमान गटनेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आलेला होता. पंचायत समिती सभापतींचा गौरव काही सदस्यांनी करण्याचा आग्रह धरला होता. त्यामूळे विद्यमान सदस्यांची शेवटीची सभा कामकाज कमी पण भावनिक अधिक झालेली होती.

LEAVE A REPLY

*