सप्तश्रृंग गडावरील 65 अतिक्रमणांवर हातोडा ; वनविभागाने केली कारवाई, अवैध धंदयांची माहिती

0

नाशिक : सप्तश्रृंग गडावर वनविभागाच्या हददीत मागील अनेक वर्षांपासून सुरू करण्यात आलेल्या 65 बेकायदेशीर दुकानांवर कारवाई करत ही दुकाने हटविण्यात आली. नाशिक वनविभागाकडून ही मोहीम राबविण्यात येवून त्यासाठी महसूल, पोलिस विभागाचेही सहकार्य घेण्यात आल्याची माहिती विभागीय वन अधिकारी (दक्षता) व्ही.टी.घुले यांनी दिली.

मागील अनेक दिवसांपासून सप्तश्रृंग गडाच्या परिसरात दुकाने सुरू करण्यात आली होती. या दुकानांमधून पुजेचे साहित्य तसेच अन्य वस्तूंची विक्री केली जात होती. हळू हळू एक एक करत या दुकानांचे वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण वाढत होते.

वारंवार सूचना देवूनही ही दुकाने हटविण्यास स्थानिक ग्रामस्थ तयार नव्हते. शेवटी जेसीबीच्या सहाययाने अतिक्रमीत 65 दुकाने जमीनदोस्त करण्यात आली. या दुकानांमधून अवैध धंदे सुरू असल्याची माहितीही पोलिस, महसूल प्रशासनाला मिळाली होती. त्यामुळे कारवाई आवश्यक होती. यावेळी 3 जेसीबीच्या सहाययाने सर्वच दुकाने काढण्यात आली. स्थानिक विक्रेते तसेच ग्रामस्थांनी या कारवाईचा विरोध केला.

परंतु पोलिस, महसुल, शीघ्र कृती दलाचे जवान, वनविभागाचे तब्बल 150 कर्मचारी या कामसाठी तैनात करण्यात आले होते. त्यामुळे या विरोधाला न जुमानता ही दुकाने हटविण्यात आली. यावेळी कळवण विभागचे तहसिलदार कैलास चावडे, पोलिस निरीक्षक सुरेश घाडगे, नाशिक येथील वन अधिकारी, वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते. बेकायदेशीर रित्या या दुकानदारांनी वन विभागाच्या जमीनींवर अतिक्रमण वाढविणे सुरू ठेवले होते. याबाबत काही सूज्ञ नागरिकांनी तक्रारीही केल्या होत्या.

शेवळी वनविभागाकडून याप्रकरणी तडक कारवाई करण्यात येवून ही जमीन ताब्यात घेण्यात आली. याठिकाणी भविष्यात कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण होवू नये यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. काही ठिकाणी लोखंडी जाळया बसविण्यात आल्या आहेत तर अजून सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. याबाबत अतिक्रमण करणारयांना वनविभागाकडून सक्त ताकीद देण्यात आली आहे. भविष्यात अतिक्रमण केल्यास फौजदारी कारवाई करण्याचा ईशाराही देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*